Join us

घरासाठी अर्ज भरायचाय? म्हाडाच्या लाइव्ह वेबिनारचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 08:40 IST

आज (१७ जून) सकाळी ११ वाजता लाइव्ह वेबिनार आयोजित करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: म्हाडाच्या ऑनलाइन सोडतीसाठी अर्जदारांना अधिक सुलभतेने अर्ज सादर करता यावा, याकरिता म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे आज, १७ जून रोजी सकाळी ११ वाजता लाइव्ह वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.

म्हाडाच्या सोडतीसाठी ज्या अर्जदारांनी नोंदणी केली आहे, त्यांनी  lottery-webinar.mhada.gov.in या लिंकवर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच सोडतीसाठी नोंदणी केलेल्या अर्जदारांना एसएमएस व https://mhada.gov.in या संकेतस्थळावरही लाइव्ह वेबिनारची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडाने केले आहे.

टॅग्स :म्हाडा