मुंबई - देशात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही शिथितला दिल्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी हजारो मजूर पायी चालत निघाले होते, तर काही जण मिळेल त्या मार्गाने जीव धोक्यात घालून प्रवास करत होते. हे विदारक चित्र पाहिल्यानंतर, यासंदर्भातील बातम्या आल्यानतर महाराष्ट्र सरकारने राज्यात अडकलेल्या नागरिकांना इच्छित स्थळी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी, विशेष श्रमिक ट्रेनही सोडण्यात आल्या आहेत. तर, एसटी बसनेही परराज्यातील नागरिकांना सीमारेषेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस विभागातील संबंधित नोडल अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच या प्रवाशांना गावी जाण्यास परवानगी देण्यात येत आहे.
औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत १६ स्थलांतरीत मजुरांचे झालेले मृत्यू हे वेदनादायी आहेत. अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर विविध राज्यात अडकून पडले आहेत. हातावर पोट असलेल्या कामगारांना काम नसल्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ लागलेली यातूनच ही दुर्दैवी घटना घटना घडली. मात्र, अद्यापही कामगार, मजूर पायी चालताना दिसत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातही अनेक नागरिक अडकले आहेत. कुणी शिक्षणासाठी, कुणी नोकरीसाठी, कुणी धंद्यासाठी, कुणी नातेवाईकांकडे तर कुणी आणखी इतर कारणासाठी इतरत्र अडकून पडले आहेत. मात्र, राज्य सरकारने अत्यावश्य सेवा आणि अशा स्थलांतरीत नागरिकांना स्वगृही जाण्याची परवानगी दिली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवास करण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार आपण अर्ज करु शकता, असे सांगत महाराष्ट्र पोलीस विभागाने काही नियमावली जाहीर केली आहे. त्यासाठी, नागरिकांना Covid19.mhpolice.in वर ई-पास मिळविण्यासाठी अर्ज करता येईल.
फॉर्म भरताना हे करा
केवळ इंग्रजीतूनच फॉर्म भरासर्व कागदपत्रे एकाच फाईलमध्ये एकत्रित कराप्रवास करताना ई-पासची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी सोबत ठेवा
फॉर्म भरताना हे करु नका
पाससाठी एकापेक्षा अधिकवेळा अर्ज करु नकाटोकन आयडी सेव्ह करायला विसरु नकाअधिकृततेशिवाय वैधते पलिकडे पास वापरु का
दरम्यान, सध्या लाखो लोकांकडून स्थलांतरीत होण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाकडे अर्ज दाखल केला जात आहे. मात्र, योग्यरितीने अर्ज न भरल्यामुळे किंवा, कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अर्ज रिजेक्ट करण्यात येत आहे. त्यामुळे, पोलीस विभागाने मार्गदर्शक प्रणाली घोषित केली आहे.
आणखी वाचा
सरकारने ताबडतोब देशातील देवस्थानचे सोने ताब्यात घ्यावे, पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला मार्ग
आत्मनिर्भरतेचं पहिलं पाऊल... गृहमंत्री अमित शहांकडून 'स्वदेशी'च्या वापराचा आदेश जारी