वैद्यकीय मंडळाची नियुक्ती करा; जे. जे. रुग्णालयाला कोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 01:19 AM2020-05-17T01:19:43+5:302020-05-17T01:20:12+5:30

लैगिंक शोषणास बळी पडलेल्या २४ आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवती मुलीचा गर्भपात करणे शक्य आहे का, यावर निर्णय घेण्यासाठी वैद्यकीय मंडळाची नियुक्ती करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला दिले.

Appoint a medical board; J. J. Court directions to the hospital | वैद्यकीय मंडळाची नियुक्ती करा; जे. जे. रुग्णालयाला कोर्टाचे निर्देश

वैद्यकीय मंडळाची नियुक्ती करा; जे. जे. रुग्णालयाला कोर्टाचे निर्देश

googlenewsNext

मुंबई : लैगिंक शोषणास बळी पडलेल्या २४ आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवती मुलीचा गर्भपात करणे शक्य आहे का, यावर निर्णय घेण्यासाठी वैद्यकीय मंडळाची नियुक्ती करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला दिले.
मुलीचे लैगिंक शोषण झाल्याने ती गर्भवती झाली. त्यामुळे तिचा गर्भपात करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती अल्पवयीन मुलीच्या आईने न्यायालयाला केली.याबद्दल पोलिसांनी गेल्यावर्षीच गुन्हा नोंदविला आहे, असेही मुलीच्या आईने न्यायालयाला सांगितले. याचिकेनुसार, मुलगी सध्या १७ वर्षांची आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ती घर सोडून पळून गेली. जानेवारी २०२० मध्ये ती घरी परत आली. मे मध्ये तिचे पोट दुखू लागले त्यावेळी ती २४ आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले.
मुलीच्या म्हणण्यानुसार, तिने घर सोडल्यानंतर ती नवी मुंबईत एका कारखान्यात काम करत होती. आरोपी तेथेच कामाला होता. न्यायालयाने तिला विचारले की, अल्पवयीन असतानाही तिला कारखान्यात काम कसे मिळाले. तिने सांगितले की, कारखान्याकडून कागदपत्रे विचारली गेली नाहीत. गरोदरपणामुळे मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे गर्भपाताची परवानगी द्यावी.
मुलीला मानसिक त्रास होत असल्याने गर्भपात करायचा आहे. त्यानंतर पुढील शिक्षण घेऊन सामान्य आयुष्य जगायचे आहे, असे म्हणत न्यायालयाने जे.जे रुग्णालयाला मुलीचा गर्भपात करण्यासंबंधी निर्णय घेण्याकरिता वैद्यकीय मंडळ नेमण्याचे निर्देश दिले. मंडळापुढे तपासणीस हजर राहण्याचे निर्देश मुलीला दिले. तर मंडळाला तपासणी अहवाल पुढील सुनावणीस सादर करण्यास सांगितले.

Web Title: Appoint a medical board; J. J. Court directions to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.