लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपचे प्रभारी नियुक्त; विधानसभेसाठीही सर्वच जागी  नावे जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 05:39 AM2023-06-09T05:39:52+5:302023-06-09T05:41:39+5:30

शिंदे गटातील खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्येही भाजपने प्रभारी नेमले आहेत.

appointed bjp in charge for lok sabha constituencies names of all the seats for the legislative assembly have also been announced | लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपचे प्रभारी नियुक्त; विधानसभेसाठीही सर्वच जागी  नावे जाहीर

लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपचे प्रभारी नियुक्त; विधानसभेसाठीही सर्वच जागी  नावे जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ४८ प्रभारी आणि विधानसभा निवडणुकीसाठी २८८ प्रभारी यांची नावे जाहीर केली. विधानसभेच्या प्रभारींपैकी अनेकजण विद्यमान आमदार आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही, याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

शिंदे गटातील खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्येही भाजपने प्रभारी नेमले आहेत. याचा अर्थ या जागा भाजप लढविणार असे अजिबात नाही. भविष्यात शिंदे यांच्या शिवसेनेला ज्या जागा मिळतील तिथे शिवसेनेच्या विजयासाठी आमचे प्रभारी पूर्ण प्रयत्न करतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांचे ओएसडी वानखेडे राजकारणात

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे ओएसडी सुमित वानखेडे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. वानखेडे यांनी ओएसडी पदाचा राजीनामा दिला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि त्याआधीदेखील वानखेडे त्यांचे पीए होते. फडणवीस मंत्री असताना त्यांचे पीए असलेले अभिमन्यू पवार हे लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे आमदार आहेत. आता वानखेडे आर्वी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक आहेत.

लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी असे 

मुंबई उत्तर - आ. योगेश सागर, मुंबई उत्तर-पश्चिम - आ. अमित साटम, मुंबई उत्तर पूर्व - भालचंद्र शिरसाट, मुंबई उत्तर-मध्य - आ.पराग अळवणी, मुंबई दक्षिण-मध्य - आ.प्रसाद लाड, मुंबई दक्षिण - मंगलप्रभात लोढा, ठाणे - विनय सहस्रबुद्धे, भिवंडी- मधुकर मोहपे, कल्याण- शशिकांत कांबळे, पालघर- नंदकुमार पाटील, मावळ- आ.प्रशांत ठाकूर, रायगड - सतीश धारप, रत्नागिरी/सिंधुदुर्ग -प्रमोद जठार, कोल्हापूर - धनंजय महाडिक, हातकणंगले - सत्यजित देशमुख, सांगली- दीपक शिंदे, सातारा- अतुल भोसले, सोलापूर- विक्रम देशमुख, माढा - प्रशांत परिचारक, धाराशिव - नितीन काळे, लातूर- दिलीप देशमुख, बीड- राजेंद्र मस्के, नांदेड- व्यंकट गोजेगावकर, छत्रपती संभाजीनगर- समीर राजूरकर, जालना- विजय औताडे, परभणी- रामप्रसाद बोर्डीकर, हिंगोली- रामराव वडकुते, नाशिक- केदा अहेर, दिंडोरी- बाळासाहेब सानप, शिर्डी- राजेंद्र गोंदकर, अहमदनगर - बाबासाहेब वाकडे, जळगाव- राधेश्याम चौधरी, रावेर- नंदू महाजन, धुळे- राजवर्धन कदमबांडे, नंदुरबार- तुषार रंधे, अमरावती- जयंत डेहनकर, यवतमाळ-वाशिम- नितीन भुतडा, बुलडाणा- विजयराज शिंदे, अकोला- अनुप धोत्रे, वर्धा - सुमित वानखेडे, नागपूर- प्रवीण दटके, रामटेक - अरविंद गजभिये, गडचिरोली- किसन नागदेवे, चंद्रपूर- प्रमोद कडू, भंडारा-गोंदिया- विजय शिवणकर, पुणे- मुरलीधर मोहोळ, बारामती- आ. राहुल कूल, शिरूर- आ.महेश लांडगे.


 

Web Title: appointed bjp in charge for lok sabha constituencies names of all the seats for the legislative assembly have also been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.