Join us

मेट्रो-३च्या १४ स्थानकांसाठी ‘उद्वाहन’ कंत्राटदार नियुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 1:15 AM

एमएमआरसीने ‘जायका’च्या खरेदी करारानुसार कफ परेड ते सिद्धिविनायक या १४ मेट्रो स्थानकांसाठी उद्वाहन प्रणालींकरिता कंत्राटदार नुकतेच निश्चित केले.

मुंबई : एमएमआरसीने ‘जायका’च्या खरेदी करारानुसार कफ परेड ते सिद्धिविनायक या १४ मेट्रो स्थानकांसाठी उद्वाहन प्रणालींकरिता कंत्राटदार नुकतेच निश्चित केले. जॉन्सन लिफ्टस् संयुक्त एसजेईसी कॉर्पोरेशन, चायना यांना पॅकेज १६ अ (एलओटी-२)चे कंत्राट निविदा नियमानुसार कायदेशीर पद्धतीने देण्यात आले. या कामामध्ये १४ स्थानकांसाठी एकूण २०५ उद्वाहन प्रणालींची डिझाइन, निर्मिती, पुरवठा, मांडणी, चाचणी, प्रत्यक्ष कार्यशीलता आणि संबंधित कार्य यांचा समावेश आहे. ही उद्वाहन प्रणाली मजबूत बांधणी, रेखीव रचना, कमी जास्त व्होल्टेजनुसार वारंवारता आणि अचूक निर्मिती व्यवस्था यासाठी मान्यताप्राप्त आहे. या उद्वाहन प्रणालीचे उत्तम तंत्रज्ञान, विद्युत बचत, वेब आधारित नियंत्रण आणि सुयोग्य निगा, रेडिओ वारंवारता निश्चिती ही वैशिष्ट्ये आहेत. आम्ही उद्वाहन प्रणाली निश्चित करताना विशेष दक्षता घेतली. कारण ही व्यवस्था थेट नागरिकांची सुरक्षितता आणि सुविधा यांच्याशी संबंधित आहे़ त्याचबरोबर, अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जा आणि मजबुती यांना कायद्याच्या बंधनात राहून प्राधान्य दिले. हे सारे करत असताना प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, याचे भान जराही ढळू दिले नाही, हे विशेष आहे, असे मेट्रो-३च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे याप्रसंगी बोलताना म्हणाल्या.

टॅग्स :मेट्रोमुंबई