दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अधिकारी नियुक्त

By admin | Published: May 26, 2017 03:52 AM2017-05-26T03:52:48+5:302017-05-26T03:52:48+5:30

मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेसह (लोकल) राज्यात विविध ठिकाणी प्रलंबित असलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारतर्फे स्थापन केलेल्या

Appointed officer after two years of waiting | दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अधिकारी नियुक्त

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अधिकारी नियुक्त

Next

जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेसह (लोकल) राज्यात विविध ठिकाणी प्रलंबित असलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारतर्फे स्थापन केलेल्या महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने पुढचे ‘स्टेशन’ गाठले आहे. दोन वर्षांपासून केवळ कागदावरच अस्तित्वात असलेल्या कंपनीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कंपनीचे अ-कार्यकारी अध्यक्ष म्हणून मुख्य सचिव सुमित मलिक तर अर्धवेळ संचालक म्हणून वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन व परिवहन-बंदरे विभागाचे प्रधान सचिव मनोज
सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती, प्रकल्प बाधितांना मदत व पुनर्वसन त्वरित व्हावे, यासाठी कंपनीची स्थापना झाली होती. २८ जून २०१५ रोजी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी सामंजस्य करार केला. मात्र त्यानंतर जवळपास वर्षभर कंपनी उभारण्याचे काम प्रस्ताव व फायलींच्या मंजुुरीअभावी केवळ कागदावरच अस्तित्वात होते.
रेल्वे मंत्रालयाने २७ मार्चला
रेल्वे बोर्डचे कार्यकारी संचालक (जेव्ही) राजेश अग्रवाल व उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (निर्माण) ए.के. राय यांची अर्धवेळ संचालक
म्हणून नियुक्ती केल्याचे सरकारला कळवले.

Web Title: Appointed officer after two years of waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.