कथित गोरक्षकांवरील कारवाईसाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:38 AM2017-10-02T04:38:14+5:302017-10-02T04:38:22+5:30

गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार व समाजामध्ये तणाव निर्माण करणा-या कथित गोरक्षकांवर कारवाई करण्यासाठी, आता प्रत्येक पोलीस दलात स्वतंत्र समन्वय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे

Appointing the officer on the instructions of the court for the action of the alleged Gorkhaland | कथित गोरक्षकांवरील कारवाईसाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकारी नियुक्त

कथित गोरक्षकांवरील कारवाईसाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकारी नियुक्त

जमीर कार्झी
मुंबई : गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार व समाजामध्ये तणाव निर्माण करणा-या कथित गोरक्षकांवर कारवाई करण्यासाठी, आता प्रत्येक पोलीस दलात स्वतंत्र समन्वय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयुक्तालयांतर्गत उपायुक्त दर्जाच्या, तर जिल्हा स्तरावर गृह उपअधीक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर, पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी त्याबाबतचे आदेश प्रत्येक पोलीस घटकप्रमुखांना बजाविले आहेत. गोरक्षकांच्या नावाखाली काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक विशिष्ट समाजातील निरपराधांना ‘टार्गेट’ करण्यात येत असल्याच्या घटना देशभरात घडल्या. त्यामुळे त्यावर शासनाने ठोस भूमिका घेण्यासाठी तहसिन पुनावाला या सामाजिक कार्यकर्त्याने गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत सुरू असलेल्या सुनावणीत वेळोवेळी केंद्र व राज्य सरकारला निर्देश देण्यात येत आहेत.
कथित गोरक्षकांकडून जाणीवपूर्वक हिंसा घडवून समाजात तणाव निर्माण केल्याचे दिसून आल्याने, न्यायालयाने यावर प्रतिबंधासाठी कारवाईचे आदेश देऊन, त्यातचा अहवाल मागितला आहे. त्यानुसार, महाराष्टÑातील प्रत्येक पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेचा (एसबी-१) उपायुक्त व अधीक्षक कार्यालयामध्ये गृह उपअधीक्षकांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केली आहे. त्यांनी कार्यक्षेत्रातील गोरक्षक संघटना, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची यादी संकलित करून, त्यांच्या हालचालीवर लक्ष, तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी, स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांना वेळोवेळी सूचना करावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे, संबंधित संघटनांच्या पदाधिकाºयांच्या बैठका घेऊन, समाजात तणाव निर्माण होऊ न देण्याबाबत सूचना करावयाच्या आहेत. त्याबाबतचा कार्यवाही अहवाल वेळोवेळी पोलीस मुख्यालयाला पाठवावयाचा आहे.

Web Title: Appointing the officer on the instructions of the court for the action of the alleged Gorkhaland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.