केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे प्रमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांची केंद्रीय औद्योगिक
सुरक्षा दलाच्या (सीआयएएफ) महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाली आहे. केंद्रीय गृह विभागाकडून बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे राज्याला नव्या वर्षात नवीन पोलीस प्रमुख मिळणार आहेत. त्यासाठी होमगार्डचे महासमादेशक संजय पांडये व एफएसएलचे हेमंत नागराळे यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे.
सुबोध जायसवाल फेब्रुवारी २०१९ पासून पोलीस महासंचालकपदी कार्यरत आहेत. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून त्यांचे फारसे सख्य नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून त्यांच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांनी तीन महिन्यांपूर्वी केंद्रात प्रतिनियुक्तीसाठी अर्ज केला होता. राज्य सरकारने त्यांना तातडीने मान्यता दिली होती. त्यानुसार बुधवारी सीआयएसएफच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
.....................