Join us

शिंदे गटाच्या चार शिवसेना नेते व २६ शिवसेनेच्या उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर

By मनोहर कुंभेजकर | Published: September 13, 2022 11:15 PM

मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई-मुंबई सह राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. 

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आज शिवसेनेचे ४ नेते आणि २६ उपनेते यांची नेमणूक करण्यात आली.पक्ष मजबूत करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल त्यांनी उचलले आहे.यशवंतराव चव्हाण केंद्राच्या जवळ असलेल्या महिला विकास मंडळाच्या हॉल मध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी या नियुक्त्या जाहिर केल्या आहेत. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी लोकमतला ही माहिती दिली.

गेल्या दि,२९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाण्यातील एकूण ९ विभागप्रमुखांच्या नियुक्त्या जाहिर केल्या होत्या. तर आज शिवसेनेचे ४ नेते आणि २६ उपनेते यांच्या नेमणूका त्यांनी जाहिर केली. शिवसेना नेतेपदी आनंदराव अडसूळ,रामदास कदम,भावना गवळी  व गुलाबराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली.

उपनेतेपदी २६ जणांची नेमणूक करण्यात आली.यामध्ये अनिल बाबर,दादाजी भुसे,गोपीकिसन बाजोरिया,श्रीरंग बारणे,ज्ञानराज चौगुले,शंभुराज देसाई,भरत गोगावले,यशवंत जाधव,अर्जुन खोतकर,दीपक केसरकर,शीतल म्हात्रे,विजय नाहाटा,चिमणराव पाटील, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील,शिवाजीराव आढळराव पाटील,शरद पोंक्षे,रवींद्र फाटक,संजय राठोड,उदय सामंत,तानाजी सावंत,सदा सरवणकर,राहुल शेवाळे,विजय शिवतारे,कृपाल तुमाणे,संध्या वढावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेना