जी-२० परिषदेच्या महाराष्ट्र भाजपच्या कार्यक्रम समितीत डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती 

By मनोहर कुंभेजकर | Published: December 25, 2022 07:04 PM2022-12-25T19:04:29+5:302022-12-25T19:05:04+5:30

महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे लोकसहभाग आणि जनजागृतीसाठी जी-२० च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.

Appointment of Dr. Ajit Gopchade In the program committee of Maharashtra BJP of G-20 conference, | जी-२० परिषदेच्या महाराष्ट्र भाजपच्या कार्यक्रम समितीत डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती 

जी-२० परिषदेच्या महाराष्ट्र भाजपच्या कार्यक्रम समितीत डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती 

googlenewsNext

मुंबई : जी-२० परिषदेच्या महाराष्ट्र भाजपच्या कार्यक्रम समितीत डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून नुकतीच घोषणा केली. महाराष्ट्रातील वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील विविध सेवाकार्य व संघटनात्मक पातळीवरील कामाची दखल घेऊन पक्षाने डॉ. अजित गोपछडे यांची समितीत नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे लोकसहभाग आणि जनजागृतीसाठी जी-२० च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश भाजप समिती कार्यरत करण्यात आली आहे. या समितीच्या 'प्रदेश संयोजक' राजेश पांडे आहेत.

जी २० सारख्या महत्वपूर्ण समितीत आपला सहभाग करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपविली, असे यावेळी डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले. 

'संघटन, सेवाकार्य आणि संवाद' या सूत्राभोवती सलग ३५ वर्षे वैद्यकीय क्षेत्र व ३० वर्षे भाजपा कार्यकर्ता म्हणून कार्यरत असल्याने संघटनात्मक कौशल्याचा अनुभव याकामी नक्कीच उपयोगी येईल, असे सांगत डॉ. अजित गोपछडे आभार व्यक्त केले.

राज्यभरात होणारे जी-२० परिषदेचे कार्यक्रम करताना रचनात्मक लोकसहभाग, युवा वर्गामध्ये आगामी संधींबद्दल जनजागृती, शिक्षण, आरोग्य, उद्योग, सहकार, आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक सक्षमता, डिजिटल क्षेत्रातील संधी मांडणे यावर आमचा भर असेल, अशी माहितीही डॉ. गोपछडे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची आर्थिक प्रगती होत असताना त्याचा सुयोग्य संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवणे, हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आद्यकर्तव्य आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची आम्हाला मदत लागणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येक भारतीयाने जी-२० च्या निमित्ताने राजकारण,पक्षभेद बाजूला ठेवून यात सहभागी होऊ या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

डॉ. अजित गोपछडे यांच्या व्यतिरिक्त या समितीत सदस्य म्हणून आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार अमरीश पटेल, आमदार निरंजन डावखरे, शायना एन सी, खासदार डॉ. अनिल बोंडे, प्रदीप पेशकर, श्वेता शालिनी, दयाशंकर तिवारी या सदस्यांचा समावेश आहे.

Web Title: Appointment of Dr. Ajit Gopchade In the program committee of Maharashtra BJP of G-20 conference,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई