एसटीच्या कर्मचारी व औद्योगिक उपमहाव्यवस्थापकपदी शैलेश चव्हाण यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 08:21 PM2020-06-05T20:21:27+5:302020-06-05T20:26:31+5:30
31 मे 2019 रोजी राज्य शासनातून सेवा निवृत्त झाले. त्यानंतर कंत्राटी पद्धतीने कार्यभार एसटी महांडळातील कर्मचारी व औद्योगिक संबंध या पदाचा पदभार सांभाळत नियोजन व पणन या पदाचा कारभार सांभाळला
मुंबई : एसटीच्या कर्मचारी व औद्योगिक महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या पदाची परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुदतवाढ नाकारली असून, एसटीतील उपमहाव्यवस्थापकपदी शैलेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, महाव्यवस्थापक सध्या पद रिक्त ठेवण्यात आले आहे. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात माधव काळे २०१६ मध्ये कर्मचारी व औद्योगिक संस्था पदासाठी एसटीमध्ये प्रतिनियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये नियोजन व पणन या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार काळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
31 मे 2019 रोजी राज्य शासनातून सेवा निवृत्त झाले. त्यानंतर कंत्राटी पद्धतीने कार्यभार एसटी महांडळातील कर्मचारी व औद्योगिक संबंध या पदाचा पदभार सांभाळत नियोजन व पणन या पदाचा कारभार सांभाळला, त्यानंतर, आता 31 मे 2020 रोजी कंत्राटी पदाच्या नेमणुकीचा कालावधी संपल्यानंतरही मुदवाढीसाठी काळे यांचे प्रयत्न सुरू होती.
31 मे 2020 रोजी एक वर्षांच्या कार्यकाळाची मुदतवाढ संपल्यानंतर अधिकार नसताना 1 जून रोजी एसटीचे परिपत्रक काळे यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर अधिकार नसतांना परिपत्रक कसे काढले, असा प्रश्न कर्मचारी संघटनेकडून उपस्थित करण्यात आला. यासह चालक-वाहक पद भरती, रोल्टा कंपनीला दिलेले 88 कोटीचे कंत्राट, ब्रिक्स कंपनीला दिलेले 450 कोटींतील स्वच्छतेचे कंत्राट यामध्ये काळे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप कर्मचारी संघटनांनी केले आहेत. यंत्र अभियंता विभागाचे महाव्यवस्थापक रघुनात कांबळे यांच्याकडे नियोजन व पणन महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर भांडार विभागाचे उपमहाव्यवस्थापक बाबाजी कदम यांना भांडार व खरेदीचे महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.