लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अखिल भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) महाराष्ट्र केडर मिळालेल्या १२ अधिकाऱ्यांची विविध जिल्हा घटकांत उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एक वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची ही नियुक्ती करण्यात येत आहेत. गृहविभागाकडून त्याबाबत नुकतेच आदेश जारी करण्यात आले आहेत.
आयपीएसच्या ७०, ७१ व ७२ या तुकडीतील म्हणजेच २०१७, २०१८ व २०१९ या वर्षातील १२ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र केडर मिळाले आहे. त्यांचा एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना आता दोन वर्षांसाठी उपअधीक्षक म्हणून नियुक्ती केली असल्याचे गृहविभागातील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
त्यांची नावे अशी- (प्रशिक्षणासाठीचा जिल्हा- नियुक्ती झालेला उपविभाग)
एम. रमेश (नंदुरबार-कळंब, उस्मानाबाद), अर्चित वीरेंद्र चांडक (जळगाव-बिलोली, नांदेड), रितू (सातारा- अकोट, अकोला), अभिनव त्यागी (अहमदनगर- मलकापूर, बुलडाणा), आयुष नोपाणी (अहमदनगर- वरोरा, चंद्रपूर), गौहार हसन (जालना- धरणी, अमरावती ग्रामीण), निकेतन कदम (अमरावती- चाकूर, लातूर), क्षेणिक लोढा (अमरावती- गंगाखेड, परभणी), आदित्य मिरखेलकर (सांगली- दारव्हा, यवतमाळ), नित्यानंद झा (सांगली- बोईसर, पालघर), पंकज कुमावत (धुळे-केज, बीड) व ऋषिकेश रावले (उस्मानाबाद- चोपडा, जळगाव).