पालिकेच्या पी उत्तर वॉर्डच्या विभाजनाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:13 AM2021-01-08T04:13:03+5:302021-01-08T04:13:03+5:30

मालाड पूर्व साठी मुंबई मनपाचा वेगळा प्रशासकीय वॉर्ड मालाडवासीयांना नवीन वर्षाची भेट मालाड पूर्वसाठी मुंबई मनपाचा वेगळा प्रशासकीय वॉर्ड ...

Approval of division of P North ward of the municipality | पालिकेच्या पी उत्तर वॉर्डच्या विभाजनाला मान्यता

पालिकेच्या पी उत्तर वॉर्डच्या विभाजनाला मान्यता

Next

मालाड पूर्व साठी मुंबई मनपाचा वेगळा प्रशासकीय वॉर्ड

मालाडवासीयांना नवीन वर्षाची भेट

मालाड पूर्वसाठी मुंबई मनपाचा वेगळा प्रशासकीय वॉर्ड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महापालिकेच्या पी उत्तर वॉर्डच्या विभाजनाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. आता पी पूर्व हा नवा वॉर्ड अस्तित्वात येणार आहे. सध्याच्या पालिकेच्या वॉर्डची सध्या असलेली संख्या आता २५ होणार आहे.

मालाड पूर्ववासीयांच्या अनेक वर्षांच्या या वॉर्ड विभाजनाच्या मागणीला यश आले आहे. मालाड पूर्वसाठी वेगळा प्रशासकीय वॉर्ड करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारने ही माहिती दिली आहे.

सद्यस्थितीतील पी/उत्तर विभागाचे विभाजन करून मालाड पूर्ववासीयांकरिता ‘पी/पूर्व’ नावाने नवीन प्रशासकीय वॉर्ड लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या नव्या प्रशासकीय वॉर्डच्या कार्यालयाकरिता आवश्यक असलेली जागासुद्धा मालाड पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ महानगरपालिकेकडून आरक्षित करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय प्रभागनिहाय लोकसंख्या व भौगोलिक परिस्थिती पाहता व सर्वाधिक लोकसंख्या पी उत्तर या प्रभागात होती, ज्यात मालाड पूर्व, मालाड पश्चिम या परिसरातील तब्बल १७ वॉर्डचा समावेश होता. या वॉर्डमध्ये मालाड पश्चिम, दिंडोशी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचा काही भाग येतो.

मालाड पश्चिम लिबर्टी गार्डनजवळ असलेल्या पी उत्तर वॉर्ड कार्यालयात महानगरपालिकेच्या संदर्भातील दैनंदिन कामे करण्याकरिता मालाडच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मागील अनेक वर्षांपासून मालाड पूर्वसाठी वेगळा प्रशासकीय प्रभाग व्हावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती.

स्थानिकांकडून होणाऱ्या मागणीच्या पूर्ततेकरिता आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार व मुंबई महानगरपालिका यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले. या निर्णयामुळे मालाडवासीयांनी समाधान व्यक्त केले असून आमदार अतुल भातखळकर यांचे आभार मानले आहेत.

----------------------------------------

Web Title: Approval of division of P North ward of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.