डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या वाढीव खर्चाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 07:23 AM2020-08-30T07:23:24+5:302020-08-30T07:23:49+5:30

कामाच्या स्वरूपात बदल झाला असला तरी त्यात विलंब टाळण्यासाठी नव्याने निविदा न काढता विद्यमान कंत्राटदार असलेल्या शापूरजी पालनजी या कंपनीमार्फतच काम पूर्ण करून घेण्याचा निर्णयही बैठकीत झाला.

Approval for increased cost of Dr. Babasaheb Ambedkar Memorial | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या वाढीव खर्चाला मंजुरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या वाढीव खर्चाला मंजुरी

Next

मुंबई : इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची वाढविल्यामुळे खर्च ७०९ कोटींवरून १०७९ कोटींपर्यंत वाढला आहे. या खर्चाला एमएमआरडीएच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सुरुवातीला तो खर्च एमएमआरडीएच्या तिजोरीतून केला जाईल. त्यानंतर राज्य सरकारकडून त्याची प्रतिपूर्ती केली जाईल, असा ठराव झाला आहे.
कामाच्या स्वरूपात बदल झाला असला तरी त्यात विलंब टाळण्यासाठी नव्याने निविदा न काढता विद्यमान कंत्राटदार असलेल्या शापूरजी पालनजी या कंपनीमार्फतच काम पूर्ण करून घेण्याचा निर्णयही बैठकीत झाला. ११ आॅक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. त्या वेळी या कामासाठी ४३५ कोटी खर्च अपेक्षित होता. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर कामाचा आराखडा मंजूर झाला तेव्हा अंदाजित किंमत ७६३ कोटी होती. त्यानंतर निविदा प्रक्रियेनुसार मे. शापूरजी पालनजी या कंपनीची नियुक्ती करून ९ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांना कार्यारंभाचे आदेश देण्यात आले. त्यानंतर गेल्या वर्षी स्मारकाची उंची ३५० फुटांवरून ४५० फूट (पायथा १०० फूट आणि पुतळा ३५० फूट) करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी स्मारकाचे पुनर्नियोजन करून संरचनात्मक रचनाही बदलण्याचा निर्णय झाला. त्यासाठी व्यवहार्यता तपासणी झाली. स्मारकाचे आयुर्मान १०० वर्षे असल्याने तसेच समुद्रकिनाऱ्यामुळे त्याचे परिणाम लक्षात घेऊन खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार ढोबळ अंदाजपत्रकीय किंमत १०८९ कोटींपर्यंत वाढली आहे. तसेच या कामाचे तंतोतंत अंदाजपत्रक सविस्तर संरचनात्मक स्थापत्य रचना पूर्ण झाल्यानंतर काढण्यात येईल. त्यात कंत्राटातील तरतुदीनुसार भाववाढ देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. ७ जुलै रोजी झालेल्या या बैठकीचे इतिवृत्त नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले असून त्यातून ही माहिती हाती आली आहे.   

अद्याप शासन निर्णय नाही
स्मारकाचा सुधारित खर्च आणि संकल्पचित्राला मंत्रिमंडळाच्या १५ जानेवारी २०२० रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मात्र, त्याबाबतचा शासन निर्णय प्राप्त झाला नसल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ७ जुलै रोजी झालेल्या बैठकीत सांगितले. त्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा शासन निर्णय निर्गमित करण्याचे आदेश अपर मुख्य सचिवांना दिले होते.

स्मारकाच्या कामात झालेली वाढ
पुतळ्याची उंची पदपीठ १०० फूट आणि पुतळा ३५० फूट अशी एकूण ४५० फूट उंची असेल.
पुतळ्याला लागणाºया बाह्यदर्शनी कांस्य धातूच्या आच्छादनाचे क्षेत्रफळ दुपटीने वाढले आहे.
पुतळ्याच्या एकूण घनफळात तिपटीने वाढ झाली आहे. आतील संरचनेच्या लोखंडाच्या वापरात चौपट वाढ होणार आहे.
वजन आणि आकारमान वाढल्याने बांधकामाचा पायाही विस्तारणार आहे.   

कलादालन संग्रहालयाच्या
स्वतंत्र निविदा
मुख्य प्रवेशद्वार इमारतीमधील उपाहारगृहे, दुकाने, त्यांची अंतर्गत सजावट, संशोधन केंद्र (ग्रंथालय व व्याख्यानवर्ग), स्मारक इमारतीमधील संग्रहालय, कलादालन या कामांचा या निविदेत समावेश नाही. त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करून मंजुरी घेतली जाईल.

Web Title: Approval for increased cost of Dr. Babasaheb Ambedkar Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.