मुंबई : विधी शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने मुंबई विद्यापीठाच्या हद्दीत नवीन ४0 विधी महाविद्यालये सुरू करण्यासाठी संस्थांनी विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांना मंगळवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिल्यास विधी महाविद्यालयांच्या शेकडो जागा वाढणार आहेत.विधी महाविद्यालयांची संख्या खूपच कमी असल्याने विधी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या हद्दीत विधी महाविद्यालय सुरू करण्यासाठी सुमारे ४0 संस्थांनी विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केले होते. तसेच सुमारे १0 महाविद्यालयांनी तुकड्या वाढविण्यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. नवीन महाविद्यालयांसह इतर नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या तुकड्या वाढविण्यासाठीही सुमारे १५0 प्रस्ताव आले होते. या प्रस्तावांनाही परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत मंजुरी देण्यात आलेले प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. या प्रस्तावांना शासनाने मान्यता दिल्यास पुढील वर्षापासून महाविद्यालयांच्या जागांमध्ये अधिक वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)पालघरसाठी नवीन प्रस्तावशासनाने गत वर्षी जाहीर केलेल्या पालघर या नवीन जिल्ह्यात नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्था सरसावल्या आहेत. १३ नवीन महाविद्यालयांनी विविध शाखांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठविले होते. व्यवस्थापन परिषदेने या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे़ तर सुमारे १५0 महाविद्यालयांनी नवीन तुकड्यांसाठी प्रस्ताव पाठविले असून, या प्रस्तावांनाही परिषदेने मान्यता दिली आहे. त्यामुळे पालघरमधील सर्व प्रस्तावांना परिषदेची मान्यता मिळाली आहे. च्विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन विद्यापीठाच्या हद्दीत विधी महाविद्यालय सुरू करण्यासाठी ४0 संस्थांनी विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केले होते.च्सुमारे १0 महाविद्यालयांनी तुकड्या वाढविण्यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केले होते. च्नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या तुकड्या वाढविण्यासाठीही सुमारे १५0 प्रस्ताव आले होते.
नवीन विधी महाविद्यालयांना मंजुरी
By admin | Published: April 30, 2015 1:49 AM