उत्पादन शुल्क विभागातील थकीत बिलांना मंजुरी

By Admin | Published: February 21, 2017 06:47 AM2017-02-21T06:47:30+5:302017-02-21T06:47:30+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागातील उपायुक्त कार्यालयातील सामग्रीसाठी, खर्च करण्यात आलेल्या

Approval of tired bills in the excise department | उत्पादन शुल्क विभागातील थकीत बिलांना मंजुरी

उत्पादन शुल्क विभागातील थकीत बिलांना मंजुरी

googlenewsNext

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागातील उपायुक्त कार्यालयातील सामग्रीसाठी, खर्च करण्यात आलेल्या ४० लाख ७८ हजार रुपयांच्या थकीत देयकांना अखेर गृहविभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. गेल्या तीन ते सहा वर्षांपासून ही बिले प्रलंबित होती.
उत्पादन शुल्क विभागाने वाहतूक परवाना पुस्तक छपाई, बांधणी, मद्यसेवन परवाना छपाई, बॅडरोलची छपाई पुण्यातील शासकीय फोटो झिंको मुद्रणालयात वेळोवेळी करून घेतली होती. मात्र, त्यासाठीची देयके सादर करूनही बिलांना मंजुरी देण्यात आलेली नव्हती. अखेर थकबाकीची रक्कम ४० लाखांच्या वर पोहोचल्याने, विभागातील अधिकाऱ्यांनी त्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यामुळे गृहविभागाने या बिलांना मंजुरी देत, त्याबाबतचे आदेश निर्गमित केले, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Approval of tired bills in the excise department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.