Join us

५४ हजार ७७७ कोटींच्या एमयूटीपी ३-अ ला राज्य शासनाची अखेर मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 2:17 AM

मुंबईच्या लोकल सेवेला अत्याधुनिक रूप देण्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ३-अ (एमयूटीपी ३ अ) च्या ५४ हजार ७७७ कोटी रु पयांच्या आराखड्यास अखेर महाराष्ट्र शासनाने बुधवारी अंतिम मंजुरी दिली

- नारायण जाधव ठाणे : मुंबईच्या लोकल सेवेला अत्याधुनिक रूप देण्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ३-अ (एमयूटीपी ३ अ) च्या ५४ हजार ७७७ कोटी रु पयांच्या आराखड्यास अखेर महाराष्ट्र शासनाने बुधवारी अंतिम मंजुरी दिली. त्यातील ५० टक्के हिस्सा अर्थात २७ हजार ३८९ कोटी रुपयांचा वाटा उचलण्यास महाराष्ट्र शासनाने समंती दर्शविली आहे.आता हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला जाणार आहे. सात हजार कोटी रुपये कर्ज घेण्यात येणार असून उर्वरीत खर्चाचा भार मुंबई, नवी मुंबई महापालिकेसह सिडको आणि एमएमआरडीएवर राहणार आहे. भविष्यात वसई-विरार आणि पनवेल महापालिकेवर या खर्चाचा भार ढकलला जाणार आहे.एमयूटीपी ३ अ मधील सर्व प्रकल्प रेल्वेचे आहेत. त्यातील नफा रेल्वे कमविणार आहे. त्याचा ५० टक्के हिस्सा अर्थात मात्र,२७ हजार ३८९ कोटी रुपयांचा खर्च राज्य शासनाने उचलण्याची तयारी दर्शविली आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्र शासन १२ हजार ५६७ कोटींचाच वाटा उचलणार असून यातील सात हजार कोटी रुपये कर्ज रुपाने तर उर्वरीत खर्चाचा भार एमएमआरडीए ३६३५.३० कोटी, सिडको १७९४.३० कोटी, मुंबई महापालिका १७९४.३० कोटी, नवी मुंबई महापालिका ५९८.१० कोटी यांच्यावर टाकला आहे.एमयूटीपी ३-अ अंतर्गत होणारी कामेसीएसएमटी ते पनवेल उन्नत मार्ग - १२ हजार १३१ कोटी रु पयेपनवेल-विरार कॉरिडोर - ७०८९ कोटी रुपयेगोरेगाव-बोरिवली हार्बर विस्तार - ८२६ कोटी रुपयेबोरिवली-विरार पाचवी व सहावी मार्गिका- २१८४ कोटी रुपयेकल्याण-आसनगाव चौथी मार्गिका - १७५९ कोटी रुपयेकल्याण यार्ड आधुनिकीकरण- ९६१ कोटी रुपयेसीबीटीसी सिग्नल यंत्रणा - ५८२८ कोटी रुपयेस्थानक विकास - ९४७ कोटी रुपये२१० एसी लोकल - १७ हजार ३७४ कोटी रु पयेगाड्यांसाठी देखभाल सुविधा - २३५३ कोटी रुपये

टॅग्स :मुंबईरेल्वेपश्चिम रेल्वेमध्य रेल्वे