वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदे मंजूर, अलिबागमध्ये ५१० पदे भरण्यास वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 12:51 AM2021-02-04T00:51:32+5:302021-02-04T00:52:12+5:30

Raigad News : मंजूर झालेल्या ५१० पदांमध्ये गट - अ मध्ये एक अधिष्ठाता, २१ प्राध्यापक, २२ सहयोगी प्राध्यापक, एक मुख्य शासकीय अधिकारी अशा ४५ पदांचा समावेश आहे

Approved posts for medical college | वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदे मंजूर, अलिबागमध्ये ५१० पदे भरण्यास वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाची मान्यता

वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदे मंजूर, अलिबागमध्ये ५१० पदे भरण्यास वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाची मान्यता

Next

अलिबाग  - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता ५१० पदांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी गट - अ ते गट - क मधील नियमित १८५ पदे व विद्यार्थी पदे १२१ त्याचप्रमाणे गट-क ( बाह्यस्रोताने ) १३९ पदे व गट- ड ( बाह्यस्रोताने ) ६५ पदे अशी एकूण ५१० व ४ टप्प्यात निर्माण करण्यास नुकतीच राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे.

मंजूर झालेल्या ५१० पदांमध्ये गट - अ मध्ये एक अधिष्ठाता, २१ प्राध्यापक, २२ सहयोगी प्राध्यापक, एक मुख्य शासकीय अधिकारी अशा ४५ पदांचा समावेश आहे . गट - ब मध्ये ४६ सहायक प्राध्यापक व एक प्रशासकीय अधिकारी अशा ४७ पदांचा समावेश आहे. गट- क मध्ये एक ग्रंथपाल, एक सांख्यिकी सहायक, दोन कार्यालयीन अधीक्षक, नऊ लघुलेखक, चार वैद्यकीय समाजसेवक, १५ वरिष्ठ सहायक, एक रोखपाल, ९ प्रयोगशाळा वाहतूक तंत्रज्ञ, २ सहायक ग्रंथपाल, १३ वरिष्ठ लिपिक, एक लघुटंकलेखक, दोन भांडारपाल, ३१ कनिष्ठ लिपिक, एक ग्रंथसूचीकार फोटो एक प्रक्षेपक अशा एकूण ९३ पदांचा समावेश असून, बाह्यस्रोताने हिसकावून भरती होणारी वर्ग -३ ची एकूण १३९ तर वर्ग -४ ची एकूण ६५ पदे मंजूर करण्यात आली आहेत.

विद्यार्थी पदे एकूण १२१ असून, त्यामध्ये चिकित्सालयीन पाम्यनिदेशक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, निवासी या पदांचा समावेश आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजूर होणार असून, प्रथम वर्षाबाबतची पदे तत्काळ निर्माण होतील व उर्वरित द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे संबंधित वर्षी निर्माण होतील.

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार वर्षनिहाय, आवश्यक पदनामनिहाय पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी सादर केल्यानुसार अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निर्माण करावयाच्या पदांच्या पदनामनिहाय पदनिर्मितीस मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे होता, त्याचा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून त्यास शासनाची मंजुरी प्राप्त करून घेण्यात यश मिळविले आहे. 

अलिबागमध्ये कॉलेज
अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीची प्रशासकीय मान्यता प्राप्त होताच इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम त्वरित सुरू करण्यात येऊन जून २०२१ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष आरसीएफ वसाहतीमधील घेण्यात आलेल्या इमारती व रायगड जिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष सुरू होईल. नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच नव्या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल.

Web Title: Approved posts for medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.