३ एप्रिलपासून ‘अन्नत्याग’, कामगार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 03:55 AM2018-03-30T03:55:13+5:302018-03-30T03:55:13+5:30

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे रेल्वे संग्रहालयात रूपांतर करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ

From April 3, 'Food Strips', Labor Invader | ३ एप्रिलपासून ‘अन्नत्याग’, कामगार आक्रमक

३ एप्रिलपासून ‘अन्नत्याग’, कामगार आक्रमक

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे रेल्वे संग्रहालयात रूपांतर करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (सीआरएमएस) मैदानात उतरला आहे. प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सीएसएमटी येथे आंदोलन सुरू असून, ३ एप्रिलपासून कामगार अन्नत्याग करून आंदोलन तीव्र करणार आहेत.
सीएसएमटीचे रेल्वे संग्रहालयात रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतला. रेल्वेमंत्री यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यामुळे सद्य:स्थितीतील रेल्वे कर्मचारी-अधिकाऱ्यांचे पी. डिमेलो मार्ग येथे स्थलांतरण होणार आहे. स्थलांतरण प्रक्रियेमुळे रेल्वेला तब्बल १ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती सीआरएमएसचे अध्यक्ष आर.पी. भटनागर यांनी दिली.
रेल्वेने १ हजार कर्मचाºयांना रेल्वे वसाहत नादुरुस्त असल्याचे कारण देत घरे रिकामे करण्याबाबत नोटिसा पाठवल्या आहेत. रेल्वे वसाहतींच्या दुरुस्तीसाठी निधी नाही आणि संग्रहालयासाठी दीड हजार कोटींचा खर्च करण्याची तयारी रेल्वे प्रशासन करत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनदेखील त्यांनी प्रतिसाद न देता जबरदस्तीने हटवण्यासाठी कारवाईचे आदेश दिल्याचे भटनागर यांनी सांगितले.
सीएसएमटी इमारतीत रेल्वेचे संग्रहालय सुरू आहे. देश-विदेशातून येणारे पर्यटक सीएसएमटीची बाह्य इमारत पाहण्यासाठी उत्सुक असतात. संग्रहालय बघणाºयांची संख्या तुलनेने कमी असल्याचे सीआरएमएस, मुंबईचे सचिव बाळा कांदळकर यांनी सांगितले. संग्रहालय सुरू झाल्यानंतर सीएसएमटीच्या वैभवात आणखी भर पडणार आहे, असे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

Web Title: From April 3, 'Food Strips', Labor Invader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.