Join us

आरे कॉलनीत बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:23 AM

आरेमधील चित्रनगरीतल्या पंपहाउस येथील तलावानजीक शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अनिकेत दिलीप पागे या मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह आरेलगतच्या वस्त्यांत पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे.

सागर नेवरेकर ।मुंबई : आरेमधील चित्रनगरीतल्या पंपहाउस येथील तलावानजीक शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अनिकेत दिलीप पागे या मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह आरेलगतच्या वस्त्यांत पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असली तरी प्रत्यक्षात मात्र अद्यापही प्रशासनाला यश आले नाही. आणि दुसरीकडे उद्यानासह आरेलगतच्या वस्त्यांमधील भीती वाढतच असून, किमान भविष्यात तरी बिबट्याच्या हल्ल्यापासून कसे वाचता येईल; किंवा बिबट्याचा हल्ला होऊ नये म्हणून काय काय करता येईल, याचा पाढाच प्रशासनाने वाचला आहे. अशाच काहीशा खबरदारीपर सुरक्षाविषयक सूचनांचा आढावा ‘लोकमत’ने घेतला आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग शहराच्या मध्यभागी आहे. वनविभागाच्या सभोवताली ३ कोटी २९ लाख लोक वास्तव्याला आहेत. या परिसरात हजारो वर्षांपासून बिबट्या वास्तव्य करतो. ज्या क्षेत्रात हल्ले होत आहेत ते क्षेत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागूनच असलेल्या वस्तीमधील आहे. त्यामुळे बिबट्यांचे मनुष्यवस्त्यांमध्ये हल्ले होऊ नयेत आणि हल्ले झाले तर पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन तत्पर असते, अशी माहिती उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद यांनी दिली.कुत्र्यांना शोधत बिबट्या येतोआपण खाद्यपदार्थ फेकतो. मग भटकी कुत्री ते खाद्यपदार्थ खातात. कुत्र्यांना शोधत बिबट्या येतो. समजा जर कोणत्याही प्रकारचे भक्ष मिळाले नाही तर एखादा प्राणी येथे कशाला येईल, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे.बिबट्याचे हल्ले सायंकाळी होतातबिबट्याचे हल्ले सायंकाळच्या वेळेला होतात. हल्ल्यामध्ये एखादे लहान मूल सापडलेले असल्याचे वारंवार ऐकायला मिळते.हे टाळाबिबट्याच्या क्षेत्रात काळजी घ्यायची असते. आवाज करत चालणे, सायंकाळच्या वेळी जाण्याचे टाळणे, लहान मुलांना घेऊन न जाणे़परिणाम लक्षात घ्या : फिल्मसिटीमध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्याचा हल्ला झाला; तेव्हा उद्यान प्रशासनाने घटनास्थळांना भेट दिली. या वेळी परिसरात शेकडो भटकी कुत्री आहेत. कुत्र्यांना रहिवासीच अन्न देत आहेत. फिल्मसिटीच्या सेटवर आर्टिस्ट येतात. तिथे काम करणारे लोक आहेत. ते खाद्यपदार्थ बाहेर टाकतात. तसेच काही अभिनेते व अभिनेत्री कुत्र्यांना खाऊ घालतात. या लोकांना वाटते की आपण कुत्र्यासाठी काही तरी चांगले करत आहोत. परंतु त्याचे परिणाम काय होत आहेत, हे कोणीही जाणून घेत नाही. याबाबत प्रशासनाने येथे जनजागृती केली आहे.