Join us  

वास्तुशास्त्रज्ञ, कंत्राटदाराची चौकशी

By admin | Published: March 21, 2015 1:58 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावरील घोटाळ्यांच्या आरोपांप्रकरणी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कंत्राटदार व वास्तुशास्त्रज्ञाची चौकशी केली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावरील घोटाळ्यांच्या आरोपांप्रकरणी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कंत्राटदार व वास्तुशास्त्रज्ञाची चौकशी केली.एसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) वरळी येथील मुख्यालयात कंत्राटदार एन. आर. दिवटे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ बी. एम. संख्ये, व्यावसायिक विनोदकुमार झा या तिघांची कसून चौकशी केली. त्यानंतर या तिघांचे जबाबही नोंदवून घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळ, त्यांचे कुटुंबीय आणि संबंधितांवर कोट्यवधींचे घोटाळे केल्याचा आरोप केला होता. तशी जनहित याचिकाही त्यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने एसीबीला विशेष तपास पथक स्थापन करून या प्रकरणी उघड चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार २० फेब्रुवारीपासून एसीबीच्या एसआयटीने उघड चौकशी सुरू केली आहे. याआधीही या प्रकरणात एसीबीने संबंधित अनेक कंपन्यांच्या संचालकांची चौकशी केली आहे. (प्रतिनिधी)