Join us

स्थापत्य समितीची टूर निघाली अंदमान दौऱ्यावर, मलनिस्सारण व्यवस्थेचा करणार अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 2:57 AM

आर्थिक वर्ष संपत येताच महापालिकेमध्ये विविध समित्यांची अभ्यास दौऱ्यांच्या नावे ‘टूरटूर’ सुरू होते. विशेष समित्यांपैकी एक असलेल्या स्थापत्य समितीची टूर कुठे जाणार? यावरून वाद रंगला होता.

मुंबई : आर्थिक वर्ष संपत येताच महापालिकेमध्ये विविध समित्यांची अभ्यास दौऱ्यांच्या नावे ‘टूरटूर’ सुरू होते. विशेष समित्यांपैकी एक असलेल्या स्थापत्य समितीची टूर कुठे जाणार? यावरून वाद रंगला होता. अखेर यावर मतदान होऊन अंदमानला जाण्याचे बहुमताने निश्चित करण्यात आले. मात्र महापालिकेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याने या टूरला भाजपच्या सदस्यांनी विरोध केला आहे.स्थापत्य समिती सदस्यांचा अभ्यास दौरा अंदमानला जाणार होता. या दौºयात तेथील मलनिस्सारण व्यवस्थेचा अभ्यास करण्यात येणार होता. मात्र भाजप पालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली असताना अशा दौºयावर करदात्यांचे लाखो रुपये उधळण्यास भाजपने विरोध केला. यामुळे यामध्ये बदल करीत शिवसेनेच्या एका सदस्याने चंदिगढचा दौरा करण्यास सुचवले. ही सूचना मंजूर करण्यात आल्यानंतर काही सदस्यांनी नाराजी दर्शवली. सदस्यांनी नाराजी दर्शवल्याने बुधवारी स्थापत्य समितीची तातडीची बैठक बोलावून पूर्वीचा निर्णय बदलत पुन्हा अंदमानचा दौरा निश्चित करण्यात आला. परंतु, भाजप सदस्यांनी आपला विरोध कायम ठेवला. यामुळे या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. यामध्ये भाजपच्या पाच सदस्यांनी विरोध केला. मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे एकूण १७ सदस्य यांनी टूरवर जाण्यास तयारी दाखविल्याने प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.दहा दिवसांत सदस्य होणार रवानाअंदमान येथील रस्त्यांचे जाळे आणि मलनिस्सारण व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी स्थापत्य समितीचा दौरा जाणार आहे.स्थापत्य समितीची मंजुरी मिळाल्यामुळे येत्या दहा दिवसांत समिती सदस्य अंदमानला रवाना होतील.या अभ्यास दौºयासाठी सुमारे २२ लाख रुपये खर्च होणार आहेत. मात्र आतापर्यंत अशा दौºयातून कोणतीही नवीन योजना मुंबईत राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे करदात्यांच्या पैशांचा हा निव्वळ अपव्यय आहे, अशी नाराजी भाजप सदस्य व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका