मुंबई महानगर परिसरातील १०७.६ चौरस किमी क्षेत्र नैसर्गिकरित्या झाले लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:05 AM2021-06-20T04:05:50+5:302021-06-20T04:05:50+5:30

उपग्रहाद्वारे अभ्यास : गेल्या ३० वर्षात सागर किनारा परिसंस्थेत होत असलेल्या वेगवान बदलांचा परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

An area of 107.6 sq km in the Mumbai metropolitan area was naturally lost | मुंबई महानगर परिसरातील १०७.६ चौरस किमी क्षेत्र नैसर्गिकरित्या झाले लुप्त

मुंबई महानगर परिसरातील १०७.६ चौरस किमी क्षेत्र नैसर्गिकरित्या झाले लुप्त

Next

उपग्रहाद्वारे अभ्यास : गेल्या ३० वर्षात सागर किनारा परिसंस्थेत होत असलेल्या वेगवान बदलांचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या ३० वर्षात सागर किनारा परिसंस्थेत होत असलेल्या वेगवान बदलांमुळे मुंबई महानगर परिसरातील एकूण १०७.६ चौरस किलोमीटर एवढे नदी, नाले आणि शेतजमीनयुक्त असलेले क्षेत्र (संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापेक्षा १०३ चौ. किलोमीटर थोडे जास्त क्षेत्र) हे नैसर्गिकरित्या लुप्त झाले. त्याचे रूपांतर गाळयुक्त दलदल किंवा कांदळवनात / खारफुटी वृक्षराजीत झाले, असे सृष्टी कन्झर्व्हेशन फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यासपूर्ण प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील किनाऱ्यावरील वाढत असलेल्या पाणी पातळीचे चिंताजनक परिणाम होत असल्याचे उपग्रहाद्वारे केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. विविध अभ्यासानुसार मुंबई आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीवर समुद्राच्या पाण्याची पातळी २०३०पर्यंत वाढत जाणार असल्याची भाकिते वर्तवली आहेत. अलीकडच्या अभ्यासामध्ये, उपग्रहाद्वारे गोळा केलेली गेल्या ३० वर्षांची (१९८९ ते २०१९पर्यंत) माहिती एकत्रित करून मुंबई महानगर आणि काेकण किनारपट्टीवर या संभाव्य वाढत असलेल्या समुद्राच्या पाणी पातळीत होत असलेल्या चिंताजनक परिणामांची माहिती समोर आली आहे. वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील किनाऱ्यालगतच्या अनेक मोठ्या रहिवासी सोसायट्या या वाढत असलेल्या सागरी पाण्याच्या पातळीच्या संकटामुळे शिकार होण्याचा धोका वाढला आहे. विशेषत: पावसाळ्यात हा धोका वाढताे.

दरम्यान, समुद्र पातळीत होत असलेल्या वाढीमुळे शहरामध्ये समुद्रकिनारे आत येत आहेत, ही सध्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे किनारपट्टीवरील लाखो लोकांची उपजीविका धाेक्यात येऊ शकते तसेच जमीन खराब झाल्यामुळे या सर्व लोकांवर विपरीत परिणाम होणार आहे.

* खाड्यांकडे लक्ष देणे गरजेचे

शहरासाठी संकुचित होत चाललेल्या खाड्या हे चांगले लक्षण नाही. कारण यामुळे मुंबई महानगरात पावसाळ्याच्या काळात येत असलेल्या मोठ्या पुरानंतर नाल्यांच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेत लक्षणीय घट होऊ शकते, असे या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. साहजिकपणे असे नाले आणि खाड्या जर गाळाने भरल्या तर त्या उथळ होतात. यामुळे खाड्यांची पाणी वाहण्याची क्षमता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. परिणामत: मोठ्या प्रमाणात पाऊस असताना आणि त्याचवेळी भरती आली तर हे समुद्राचे पाणी शहरामध्ये सर्व भागांमध्ये पसरेल.

- डॉ. दीपक आपटे,

कार्यकारी संचालक, सृष्टी कन्झर्व्हेशन फाऊंडेशन

* चाैकट

खारे पाणी सखल भागात घुसत आहे. अशा ठिकाणच्या भात खाचरांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवने किंवा खारफुटी वनस्पती वाढीस लागल्या आहेत. याचे उदाहरण म्हणजे उरणमधील कारंजा भागात खारे पाणी जवळपास ६०.६ एवढ्या शेतीयोग्य भू क्षेत्रावर खाडीसारखे आत शिरल्याने या सर्व कृषी (भातशेती) भूमीवर खारफुटींचे प्रमाण सुमारे ४.५ पटीने वाढले आहे. सद्यस्थितीत हे सर्व क्षेत्र कांदळवनात रुपांतरिेत झाले आहे.

मुंबई-ठाणे खाडीच्या जमिनीवर अंदाजे ४७ चौरस किलोमीटर नदी / नाल्यांचे क्षेत्र हे जमिनीमध्ये (खारफुटी / गाळयुक्त दलदलीने) रुपांतरित झाले आहे. याचप्रकारे ठाणे खाडीमध्ये २४ चौ. किलोमीटरचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हा सर्व परिणाम गाळयुक्त चिखल जमा झाल्याने, पावसाळ्या व्यतिरिक्तच्या काळात गोड्या पाण्यात झालेली घट आणि सतत वाढत असलेल्या समुद्र पातळीचा होत असलेला परिणाम यामुळे झाला आहे.

......................................................................

Web Title: An area of 107.6 sq km in the Mumbai metropolitan area was naturally lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.