Join us

ऐरोलीत पाच तास बत्ती गुल

By admin | Published: November 26, 2014 1:02 AM

ऐरोलीमध्ये रविवारी रात्री सबस्टेशनला अचानक आग लागली. स्थानिक नागरिकांच्या दक्षतेमुळे आग वेळेत आटोक्यात आणण्यात आली.

नवी मुंबई : ऐरोलीमध्ये रविवारी रात्री सबस्टेशनला अचानक आग लागली. स्थानिक नागरिकांच्या दक्षतेमुळे आग वेळेत आटोक्यात आणण्यात आली. यामुळे परिसरात जवळपास पाच तास वीजपुरवठा खंडित झाला होता. 
रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सबस्टेशनला अचानक आग लागली. स्थानिक नगरसेवक अशोक पाटील व इतर नागरिकांनी फायर एस्टिंग्युशरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. सबस्टेशनचे नुकसान झाल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. येथील सेक्टर 14 व 15 मधील महावितरणचे डीपी बॉक्स अनेक वेळा उघडे असतात. यामुळे अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे. डीपी बॉक्स व सबस्टेशनची कामे करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. परंतु महावितरण प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे. 
स्थानिक नगरसेवक अशोक पाटील यांनी मंगळवारी तत्काळ महावितरण अधिका:यांना परिसरातील विद्युत डी.पी. बॉक्सची व इतर दुरुस्तीची कामे करण्याची मागणी केली. भविष्यात एखादा अपघात झाल्यास त्यास महावितरण पदाधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही दिला आहे.