अटल रँकिंगमध्ये आयआयटी मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:59 PM2020-08-18T15:59:16+5:302020-08-19T04:54:32+5:30

आयआयटी बॉम्बेने २०१९ मध्येही या विभागात दुसरे येण्याचा मान मिळविला होता

ARIIA 2020 IIT Mumbai second in Atal rankings for innovation | अटल रँकिंगमध्ये आयआयटी मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर

अटल रँकिंगमध्ये आयआयटी मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर

Next

मुंबई : अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इनोव्हेशनच्या मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत आयआयटी मुंबईने दुसरे स्थान पटकावले आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे स्थान कायम राखले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आॅनलाइन पद्धतीने देशाच्या संशोधनात उत्कृष्ट कामगिरी बजावणाºया शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. प्रथम क्रमांक तामिळनाडूच्या आयआयटी मद्रासने पटकावला.
पहिल्या ५० शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या नागपूर येथील विसवेश्वराया नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीनेही स्थान प्राप्त केले. शासकीय संस्थांच्या विभागाच्या विद्यापीठांच्या यादीत मुंबईच्याच इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीने प्रथम क्रमांक, तर पहिल्या २५ मध्ये महाराष्ट्राच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने स्थान मिळविले आहे.
देशातील महत्त्वाच्या महाविद्यालयांमध्ये मुंबईचे वीर जिजामाता टेक्निकल महाविद्यालय आणि आणि गुरू गोविंद सिंहजी इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीने स्थान पटकावले. या यादीत पुण्याच्या कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग महाविद्यालयाने प्रथम येण्याचा मान मिळविला. खासगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत नागपूरच्या रायसोनी महाविद्यालयाने यादीत स्थान मिळविले.
अटल रँकिंग आॅफ इन्स्टिट्यूशन आॅफ इनोव्हेशन पुरस्कारांची सुरुवात २०१८ साली मानव संसाधन विकास विभागाने केली. संशोधन, विकास आणि उद्योजकता या निकषांच्या आधारावर देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे, महाविद्यालये यांची क्रमवारी ठरविण्याच्या दृष्टीने याची सुरुवात करण्यात आली. यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन, जागरूकता, सुविधा, आर्थिक नियोजन, शिकण्याच्या पद्धती तसेच शिक्षण संस्थांची एकूण पद्धती या निकषांचाही विचार केला जातो.
>सातत्याने कार्यरत राहणार
समाजाच्या उपयुक्ततेसाठी आवश्यक असे संशोधन आणि उद्योगाद्वारे त्याची निर्मिती यांमध्ये आयआयटी मुंबईने जे यश मिळविले आहे ते उल्लेखनीय आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी आम्ही यापुढेही सातत्याने कार्यरत राहणार आहोत.
- सुभाशीष चौधरी, संचालक, आयआयटी मुंबई
>उद्योगासह शिक्षणाचा ताळमेळ
आयआयटी मुंबईने २०१९ सालीही या विभागात दुसरे येण्याचा मान मिळविला होता, यंदाही शैक्षणिक संस्थेने आपले स्थान कायम राखले. आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत समाजाच्या उपयोगी येतील अशी संशोधने आणि त्यांची निर्मिती यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. आम्ही उद्योग-शिक्षण यांचा ताळमेळ घालून ही वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- मिलिंद अत्रे, संशोधन, विकास विभागप्रमुख, आयआयटी मुंबई

Web Title: ARIIA 2020 IIT Mumbai second in Atal rankings for innovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.