Join us

अरमान कोहलीला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 6:45 AM

लिव्ह इन मध्ये राहणारी मैत्रीण नीरू रंधवा मारहाण प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहली याचा जामीन अर्ज बुधवारी कोर्टाने फेटाळला. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई : लिव्ह इन मध्ये राहणारी मैत्रीण नीरू रंधवा मारहाण प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहली याचा जामीन अर्ज बुधवारी कोर्टाने फेटाळला. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.कोहलीला मंगळवारी लोणावळ्यातून सांताक्रु झ पोलिसांनी अटक केली होती. गेली तीन वर्षे त्याच्यासोबत राहणारी त्याची मैत्रीण रंधवा हिला त्याने त्याच्या जुहूमधील घरात बेदम मारहाण केली. ज्यात तिचे डोके फुटले असून, जवळपास १६ टाके घालण्यात आले आहेत. शुल्लक कारणावरून कोहलीने तिच्यावर हात उचलला, असा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी रंधवाने तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. बुधवारी त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळत त्याला २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त भारगुडे यांनी दिली.रंधवाने पोलिसात तक्रार करू नये म्हणून कोहली आणि तिच्या घरच्यांनी तिची समजूत काढल्याचे तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते; पण ‘मी हा अत्याचार सहन करू शकत नाही. मारहाणीत मी डोळा गमावू शकले असते, अथवा माझा चेहरा विद्रूप झाला असता, त्यामुळे मी पुन्हा कोहलीकडे परतणार नाही’, असेही तिने या वेळी नमूद केले. त्याच्या अनेक प्रॉपर्टीची कामे पाहते, त्या बदल्यात मला काहीच मिळत नाही. उलट चुकीची वागणूक मिळते, अशी खंतही तिने व्यक्त केलीे.

टॅग्स :तुरुंगगुन्हे