Join us

शस्त्रास्त्रांसह बारबालांनी केले होते ‘सेल्फी शूट!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 4:07 AM

अंधेरीच्या ‘वुई व्हीआयपी’ क्लबमध्ये निशा नामक बारबालेच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान गोळीबार करण्यात आला.

गौरी टेंबकर-कलगुटकर  मुंबई : अंधेरीच्या ‘वुई व्हीआयपी’ क्लबमध्ये निशा नामक बारबालेच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान गोळीबार करण्यात आला. ही बारबाला सध्या फरार आहे. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक दया नायक आणि त्यांच्या पथकाने वाकोल्यातून जी विनापरवाना शस्त्रास्त्रे हस्तगत केली त्यांसोबत निशा आणि अन्य बारबालांनी ‘सेल्फी शूट’ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकरच संबंधित क्लबचा परवाना रद्द केला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.नायक आणि त्यांच्या पथकाने विनापरवाना दोन काळ्या रंगाच्या १२ बोअर पंप एक्शन पाइपगन, ०.३२ बोअरचे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे, दुर्बीण असलेल्या दोन रायफली आणि पुंगळ्या आदी शस्त्रसामग्री हस्तगत केली. याच शस्त्रास्त्रांसह निशा आणि त्या रात्री क्लबमध्ये तिच्या सोबत हजर असलेल्या अन्य बारबालांनी वेगवेगळ्या पोझ देत ‘सेल्फी’ काढले आहेत. ही बाब क्लबमधून अटक करण्यात आलेल्या स्टाफकडून पोलिसांना समजल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.तो ‘मिसफायर’ होता? : मालाडच्या बारमधील बारबाला निशा हिच्या ‘बर्थ डे’ पार्टीदरम्यान रविवारी हरयाणाचा व्यावसायिक राकेश कालरा याचा बॉडिगार्ड महेंद्र मलिक याने ‘वुई व्हीआयपी’ क्लबमध्ये गोळीबार केला. जो फक्त ‘मिसफायर’ असल्याची सारवासारव त्यांच्याकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जी शस्त्रे कालरा आणि त्याच्या साथीदारांकडे सापडली त्यातील एकाही शस्त्राचा परवाना त्यांच्याकडे नसल्याचेही उघड झाले आहे.