मुंबई : भांडुपमधील रमाबाई आंबेडकरनगरात काल रात्री 1क्च्या सुमारास वैभव इंगळे (23) या तरुणावर अज्ञात सशस्त्र जमावाने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात वैभव जबर जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, याच जमावाने वैभववर हल्ला करण्याआधी व नंतर रमाबाईनगरातील लहान मुले, वृद्ध आणि महिलांवरही हल्ला केला. त्यात सात ते आठ जण जखमी झाल्याचे समजते.
या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अज्ञात जमावाविरोधात हत्येचा प्रय}, मारहाणीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत या हल्ल्यामागे भांडुपमधील संघटित टोळी असावी, असा संशय पोलिसांना आहे.
वैभव रमाबाई नगरातील कपिलवस्तू बुद्धविहार परिसरात वास्तव्यास आहे. त्याच्याकडे महापालिकेची प्लंबिंगची छोटी-मोठी कंत्रटे आहेत. तसेच तो शिवसेना कार्यकर्ता आहे. काल रात्री 1क्च्या सुमारास तोंडावर रूमाल बांधलेले, हातात तलवारी-चॉपरसारखी हत्यारे घेतलेले 2क् ते 25 तरुण धावत रमाबाईनगरात आले. येताना त्यांनी वाटेत जो सापडेल त्याच्यावर वार केले, धक्काबुक्की केली. दरम्यान या जमावाने वैभवला पकडले आणि त्याच्यावर हल्ला केला. वैभवच्या डोक्यात सात, तर हातावर दोन ते तीन वार केले आहेत. शिवाय त्याच्या शरीरावर सर्वत्र लाथाबुक्क्यांचे वळही दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
च्भांडुपमध्ये संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व अजूनही आहे. त्यातल्याच एका टोळीवर पोलिसांचा संशय आहे. या टोळीशी संबंधित दोन अभिलेखावरील गुन्हेगारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.