मुंबई : पालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाच्या महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शिवसेना-भाजपा युतीमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे़ गेले वर्षभर उभय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला असताना भाजपाचे रात्रबाजारपेठ, शिवसेनेचे गच्चीवर उपाहारगृह (रुफटॉप रेस्त्राँ) आणि मेट्रो ३ प्रकल्पाचा प्रस्ताव पालिका महासभेपुढे अंतिम मंजुरीसाठी आला आहे. त्यामुळे एकमेकांना शह देण्यासाठी सत्ताधारीच पुन्हा एकदा भिडण्याची चिन्हे आहेत़भाजपा स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याने शिवसेनेनेही परस्पर प्रकल्प जाहीर करण्यास सुरुवात केली आहे़ त्याचवेळी मित्रपक्षाचा प्रकल्प व योजना हाणून पाडण्यासाठी उभय पक्षांमध्ये स्पर्धाच सुरू आहे़ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नाइट लाइफच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या भाजपाने रात्रबाजारपेठेची संकल्पना मंजूर करून घेतली आहे़ तर शिवसेनेचे समर्थन असलेल्या गच्चीवरील उपाहारगृहाला भाजपाने विरोध दर्शविला आहे़ त्याचवेळी मेट्रो ३ प्रकल्पांतर्गत कुलाबा वांद्रे सीप्झ या प्रकल्पाला शिवसेनेकडून विरोध सुरू आहे़ असे मित्रपक्षाच्या प्रकल्पांच्या मार्गात अडथळे आणत उभय पक्षांमध्ये एकमेकांना शह देण्याचे राजकारण सुरू आहे़ रात्रबाजारपेठेची संकल्पना भाजपाचे आमदार अमित साटम यांनी मांडली होती़ तर समाजवादी पक्षाचे फरहान आझमी यांच्या गच्चीवर उपाहारगृहाच्या मागणीला शिवसेनेने समर्थन दिले होते़ मात्र आदित्य ठाकरे यांच्या नाइट लाइफ संकल्पनेशी संदर्भ लावत संस्कृतीला धोका असल्याची भीती व्यक्त करीत भाजपाने विरोध केला़ तर दुसरीकडे मेट्रो-३ प्रकल्पाला विरोध करीत शिवसेनेने भाजपा सरकारला आव्हान दिले आहे़ (प्रतिनिधी)असा आहे प्रस्तावमुंबईत गच्चीवरील उपाहारगृह बेकायदा पद्धतीने सुरू असल्याने ते अधिकृत करून पालिकेचा महसूल वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने २०१२मध्ये घेतला़ समाजवादी पक्षाचे फराहन आझमी यांच्या मागणीनुसार हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंजुरीसाठी सुधार समितीपुढे पाठविण्यात आला़ युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नाइटलाइफच्या प्रस्तावाला धरून असलेल्या या प्रस्तावाला शिवसेनेचे समर्थन होते़ मात्र भाजपाने काँगेस, राष्ट्रवादी, मनसे या विरोधी पक्षांच्या मदतीने सुधार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळला होता़भाजपाचा विरोध कशालाआदित्य ठाकरे यांच्या नाइटलाइफप्रमाणेच गच्चीवर उपाहारगृहाचा प्रस्ताव हे पाश्चात्त्य खूळ असून, यामुळे संस्कृती धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करीत भाजपाने यास विरोध दर्शविला होता़रात्र बाजारपेठ साकारणारशहर फेरीवाला समितीपुढे रात्र बाजारपेठेचा प्रस्ताव ठेवून याबाबत धोरणच आखण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे़ त्यामुळे निवडणुकीपूर्वी भाजपाचा हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत़मेट्रोचा वाद : कुलाबा वांद्रे सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पासाठी मेट्रो रेल महामंडळाने पालिकेकडून १७ भूखंड मागितले आहेत़ यापैकी काही भूखंड ११ महिन्यांच्या कालावधीसाठी तर काही भूखंड कायमस्वरूपी मेट्रो रेल्वेसाठी द्यावे लागणार आहेत़ यामध्ये हुतात्मा चौक येथील ४२५ मीटर जागेचाही समावेश आहे़ मात्र हुतात्मा चौक या वास्तूचा भाग मेट्रोसाठी देण्यास शिवसेना सदस्यांनी विरोध दर्शविला़ ंयासाठी गच्चीवर उपाहारगृहमुंबईत ८०० ठिकाणी गच्चीवर उपाहारगृहे चालविली जात आहेत़ त्यांच्यावर पालिकेने अनेकवेळा कारवाई केली़ परंतु अशी उपाहारगृहे अनेक ठिकाणी सुरूच असून, यात पालिकेचा महसूल बुडतो आहे़ त्यामुळे गच्चीवर उपाहारगृहाला परवानगी देण्याची मागणी हॉटेल मालकांकडून पुढे आली होती़ नोव्हेंबर २०१२मध्ये ही मागणी मान्य करीत प्रशासनाने धोरण तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या़
सेना-भाजपा पुन्हा भिडणार?
By admin | Published: February 27, 2016 3:06 AM