सेना-भाजपा एकत्रितपणो लढणार
By admin | Published: December 6, 2014 10:20 PM2014-12-06T22:20:57+5:302014-12-06T22:20:57+5:30
विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या भाजपा-सेनेमध्ये आता समझौता होऊन सेनेला मंत्रीमंडळामध्ये सामावून घेण्यात आले आहे.
Next
दीपक मोहिते ल्ल वसई
विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या भाजपा-सेनेमध्ये आता समझौता होऊन सेनेला मंत्रीमंडळामध्ये सामावून घेण्यात आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर येणा:या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका ते एकत्रितपणो लढण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्हय़ातील 57 गट व 114 गणाच्या जागा असून सेना सर्वाधिक जागांवर उमेदवार उभे करेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
गेल्यावेळी झालेल्या निवडणुकांमध्ये सेनेने भाजपाच्या तुलनेत सरस कामगिरी केली होती. विशेष म्हणजे पालघर तालुक्यात सर्वाधिक जागा सेनेच्या पारडय़ात गेल्या होत्या व पंचायत समितीवरही सेनेचाच ङोंडा फडकला होता. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांना शहरी भागासमवेत ग्रामीण भागातही मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपाही या निवडणूकांमध्ये अधिक जागांवर दावा करण्याची शक्यता आहे. बहूजन विकास आघाडीनेही या निवडणूका लढवण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. वसई, नालासोपारा व बोईसर या तीन विधानसभा जिंकल्यामुळे कार्यकत्र्यामध्ये उत्साह दूणावला आहे व तेही आता जिल्हय़ातील सर्वच्या सर्व जागा लढवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मात्र अद्याप सामसूम आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर कार्यकत्र्यामध्ये नैराश्य निर्माण झाले आहे.
या पराभवानंतही काँग्रेसच्या पदाधिका:यामध्ये समन्वय निर्माण होऊ शकला नाही. त्यामुळे या निवडणुकांना ते प्रभावीरित्या सामोरे जातील अशी शक्यता नाही. आ. पंडीत प्रणित जनआंदोलन समितीही अद्याप पराभवातून सावरलेली नाही. त्यामुळे तेही या निवडणुकांमध्ये आव्हानाला कसे सामोरे जातात हे पहावे लागले.
गेल्या 5 वर्षात ग्रामीण भागात भरीव विकासकामे न झाल्यामुळे मतदारांमध्येही उत्साहाचा अभाव दिसून येत आहे. पाणी, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रमध्ये जि.प. व पंचायत समितीच्या माध्यमातून भरीव विकासकामे होऊ शकली नाहीत.
जिल्हा विभाजनानंतर प्रशासकीय कामकाज पूर्णपणो विस्कळीत झाले असून ते निवडणुकानंतरच सुरळीत होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या निकालामध्ये त्याचे परीणाम दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा कस लागणार आहे.
4लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांना शहरी भागासमवेत ग्रामीण भागातही मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपाही या निवडणूकांमध्ये अधिक जागांवर दावा करण्याची शक्यता आहे. बहूजन विकास आघाडीनेही या निवडणूका लढवण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. वसई, नालासोपारा व बोईसर या तीन विधानसभा जिंकल्यामुळे कार्यकत्र्यामध्ये उत्साह दूणावला आहे व तेही आता जिल्हय़ातील सर्वच्या सर्व जागा लढवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मात्र अद्याप सामसूम आहे.
4गेल्या 5 वर्षात ग्रामीण भागात भरीव विकासकामे न झाल्यामुळे मतदारांमध्येही उत्साहाचा अभाव दिसून येत आहे. पाणी, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रमध्ये जि.प. व पंचायत समितीच्या माध्यमातून भरीव विकासकामे होऊ शकली नाहीत. जिल्हा विभाजनानंतर प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले असून ते निवडणुकानंतरच सुरळीत होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या निकालामध्ये त्याचे परीणाम दिसून येण्याची शक्यता आहे.