परभणी : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तब्बल ४२ हजार ७०५ मेट्रिक टन खताची खरेदी केली खरी परंतु पावसाने दगा दिल्याने हजारो मेट्रिक टन खत ़शेतात पडण्याऐवजी घरातच पडून आहे़ सध्या आकाशाकडे डोळे लागून बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात प्रतिक्षेशिवाय काहीही नाही़जून महिना संपत आला तरीही राज्यासह परभणी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली़ त्यामुळे पावसाळ्यात पाणीटंचाईसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे़ आजून दहा ते बारा दिवस पाऊस न पडल्यास दुष्काळ्याच्या छळा बसण्यास सुरूवात होईल़ जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे, खत आदींची खरेदी करून ठेवली़ परंतु जून महिना संपत आला तरीही पाऊस पडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरामध्ये खताचा साठा करून ठेवला आहे़ तसेच काही बागायगती शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली आहे़ परंतु, उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत असल्याने ही पिकेही जळू लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे़ आता शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून पाऊस कधी पडतो याकडे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)विक्री झालेला खतयुरिया- २४ हजार २०० मे़ टन, आमोनियम सल्फेट- ४१ मे़ टन, डीएपी- १८३० मे़ टन, एसएसपी- ३६०० मे़ टन, एमओपी- ५३० मे़ टन, १५:१५:१५ - १३७०मे़ टन, २०:२०:००- १५९५ मे़ टन, १९:१९:१९ - ६० मे़ टन, १६:१६:१६ - १३८ मे़ टन, १०:२६:२६ - ४१९३ मे़ टन, १२:३२:१६ - १३० मे़ टन, १४:३५:१४ - ७६५ मे़ टन, १५:१५:१५:०:०९ - १२९३ मे़ टन, २५:२४:०० - १४४० मे़ टन, संयुक्त खत- १०९८४ मे़ टन, १८:१८:१० - १५२० मे़ टन असे एकूण ४२ हजार ७०५ मे़ टन खताची विक्री करण्यात आली आहे़
सेनेची व्यूहरचना
By admin | Published: June 26, 2014 11:35 PM