विद्यार्थिनीच्या फसवणूकप्रकरणी आराेपीला बिहारमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:11 AM2021-01-13T04:11:07+5:302021-01-13T04:11:07+5:30
नामांकित महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली उकळले लाखाे रुपये लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विद्यार्थिनीला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली ...
नामांकित महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली उकळले लाखाे रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यार्थिनीला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळत तिची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी बिहारमधून एकाला अटक केली.
रोशन कुमार सुधाकांत झा (वय ३४) असे अटक आराेपीचे नाव आहे. ११ जून २०१८ मध्ये आरोपीची तक्रारदार तरुणीशी ओळख झाली. त्याची एम. जी. महाविद्यालयात ओळख असून, तेथे प्रवेश मिळवून देण्यासाठी त्याने तिच्याकडून २२ लाख १९ हजार रुपये घेतले. मात्र, तिला प्रवेश घेऊन दिला नाही. नंतर पैसे परत करण्यास टाळाटाळ करू लागला. तिने ओशिवरा पोलिसांत तक्रार करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विजय वगरे, पोलीस हवालदार नलावडे, शिपाई संग्राम जाधव या पथकाने तपासाअंती बिहारमधून त्याला अटक केली.