थकीत देयके लवकरच अदा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:06 AM2020-12-22T04:06:54+5:302020-12-22T04:06:54+5:30

हाफकिन प्रशासनाचे औषध वितरकांना आश्वासन थकीत देयके लवकरच अदा करणार हाफकिन प्रशासनाचे औषध वितरकांना आश्वासन लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...

Arrears will be paid soon | थकीत देयके लवकरच अदा करणार

थकीत देयके लवकरच अदा करणार

Next

हाफकिन प्रशासनाचे औषध वितरकांना आश्वासन

थकीत देयके लवकरच अदा करणार

हाफकिन प्रशासनाचे औषध वितरकांना आश्वासन

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील १०० पेक्षा अधिक औषध वितरकांची वर्षभरापासूनची तब्बल १०३ कोटी रुपयांची देयके राज्य सरकारकडून थकवण्यात आली आहेत. त्यामुळे राज्य सरकारला औषधपुरवठा न करण्याबरोबरच निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय औषध वितरकांनी घेतला होता. औषध वितरकांच्या आंदोलनचा सोमवारी सातवा दिवस होता. मात्र, येत्या आठवड्यात प्रशासनाकडून थकीत देयके अदा करण्यात येतील, असे आश्वासन हाफकीन व्यवस्थापकीय संचालक यांनी दिल्याची माहिती औषध वितरक संघटनेच्या अभय पांडे यांनी दिली.

प्रशासनाकडून रविवारपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने, औषध वितरकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, सोमवारी हाफकिन व्यवस्थापकीय संचालक राठोड यांच्याशी बोलणे होऊन देयके अदा करण्याचे आश्वासन दिल्याचे पांडे यांनी सांगितले. तत्पूर्वी जूनपासून काढलेल्या तब्बल ८३ निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय औषध वितरकांनी घेतला. त्या संदर्भातील पत्र ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाउंडेशनकडून हाफकिन बायोफार्मास्युटीकलला पाठवले होते. थकीत देयके मिळावीत, यासाठी वर्षभरापासून औषध वितरकांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे खरेदी कक्षाकडून दुर्लक्ष करून औषध वितरकांची देयके मंजूर करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने औषध वितरकांनी १४ डिसेंबरपासून औषधपुरवठा बंद केला आहे.

* ...ताेपर्यंत आंदाेलन सुरूच राहणार

हाफकिन व्यवस्थापकीय संचालकांनी देयके अदा करण्याचे आश्वासन दिले असले, तरीही जोपर्यंत आमची देयके मंजूर होत नाहीत, तोपर्यंत आम्ही औषधपुरवठा न करण्याचे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.

- अभय पांडे,

अध्यक्ष, ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाउंडेशन

------------------------------

Web Title: Arrears will be paid soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.