युरोपमधून ड्रग्जची आयात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परदेशातून अमली पदार्थांची आयात करणाऱ्या ड्रग्ज तस्कराला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) पथकाने मंगळवारी (दि. १५) अटक केली. मकरंद प्रदीप अडिवीकर असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव असून गेल्या आठ महिन्यांपासून तो फरार होता.
बिटकॉइनच्या माध्यमातून तो डार्कनेट वेब या साईटवरन अमली पदार्थांची खरेदी करीत होता. एनसीबीने गेल्यावर्षी २० नोव्हेंबरला मालाड येथील खारोडी व्हिलेज येथे छापा टाकून २० एलएसडी ब्लॉट जप्त केले होते. ते युरोपमधून बिटकॉईनच्या माध्यमातून खरेदी करण्यात आले होते. ‘डार्कनेट वेब’वरून ते मागविले होते.
तस्कर अरविंदला क्राप्टोकिंग म्हणून ओळखले जाते. तो रोख रक्कम स्वीकारून त्या बदल्यात बिटकॉईनच्या माध्यमातून माल मागवीत होता.
...................................