Join us

अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक,गुन्हे शाखेची कारवाई; देशी कट्ट्यासह दोन काडतुसे जप्त 

By सूर्यकांत वाघमारे | Published: January 01, 2024 6:16 PM

Navi Mumbai News: गुन्हे शाखा पोलिसांनी तळोजा येथून दोघांना अटक करून त्यांच्याकडून देशी कट्टा व दोन काडतुसे जप्त केली आहेत. त्यांच्याकडे एक बनावट पिस्तूल देखील आढळून आले. पिस्तूलच्या व्यवहारासाठी ते तळोजा परिसरात आले असता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

नवी मुंबई - गुन्हे शाखा पोलिसांनी तळोजा येथून दोघांना अटक करून त्यांच्याकडून देशी कट्टा व दोन काडतुसे जप्त केली आहेत. त्यांच्याकडे एक बनावट पिस्तूल देखील आढळून आले. पिस्तूलच्या व्यवहारासाठी ते तळोजा परिसरात आले असता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

तळोजा परिसरात अग्निशस्त्र विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. यावरून गुन्हे शाखा कक्ष ३ चे वरिष्ठ निरीक्षक पराग सोनवणे, सहायक निरीक्षक संतोष चव्हाण, उपनिरीक्षक आकाश पाटील यांच्या पथकाने रविवारी पहाटे ३ च्या सुमारास सापळा रचला होता. यावेळी त्याठिकाणी आलेल्या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली. त्यामध्ये त्यांच्याकडे एक देशी कट्टा व दोन काडतुसे तसेच एक बनावट पिस्तूल आढळून आले. अमरनाथ सिंग (२१) व अभिषेक सिंग (२६) अशी त्यांची नावे असून ते बिहार व उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत. त्यांच्यावर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :अटकगुन्हेगारी