Join us  

पंकज भुजबळांची अटक टळली

By admin | Published: August 05, 2016 1:45 AM

पंकज भुजबळ यांना ८ आॅगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना ८ आॅगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले आहेत. विशेष पीएलएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रींग अ‍ॅक्ट) न्यायालयाने पंकज भुजबळ यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे.महाराष्ट्र सदन घोटाळ््याप्रकरणी माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ अटकेत आहेत. पंकज भुजबळ यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी न्या. पी. एन. देशमुख यांच्यापुढे होती. न्या. देशमुख यांनी अटकपूर्व जामिनावरील सुनावणी ८ आॅगस्टपर्यंत तहकूब केली. मात्र तोपर्यंत पंकज भुजबळ यांना अटक न करण्याचे आदेश दिले. ईडीने महाराष्ट्र सदन घोटाळा, कलिना भूखंडप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर आणि मुलगा पंकज यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)