"फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला अटक करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 01:43 AM2020-05-01T01:43:49+5:302020-05-01T06:36:43+5:30

फेसबुक पोस्ट व कमेंट टाकणा-या या समाजकंटकांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या एका शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.

"Arrest the person who posted offensive posts about Fadnavis" | "फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला अटक करा"

"फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला अटक करा"

Next

मुंबई  : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीला सामाजिक माध्यमांमध्ये असंसदीय शब्दात टीका केली जात आहे. घाणेरडी, अश्लील व्यंगचित्रे पोस्ट करण्यात येत आहेत. ही टीका अत्यंत हीन दर्जाची आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी व फेसबुक पोस्ट व कमेंट टाकणा-या या समाजकंटकांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या एका शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे देण्यात आलेले हे निवेदन तातडीने पोलिस आयुक्तांकडे पाठविण्याची सूचना दरेकर यांनी उपायुक्त स्वामी यांना केली. यावेळी आमदार भाई गिरकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, भाजप उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थित होते. कोरोनाच्या संकटकाळात विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याविरुध्द समाजमाध्यमांमध्ये सुरू असलेली असंसदीय टीका बंद होईल अशी आमची अपेक्षा होती, पण तरीही हीन दर्जाची टीका सुरू राहिल्यामुळे ही तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याने समाजमाध्यमांवर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याच्याविरुध्द तातडीने कारवाई करण्याची तत्परता पोलिसांकडून दाखविली जात आहे. जर कायदा सर्वांना समान असेल तर फडणवीस यांच्याविरुध्द पोस्ट टाकणाºया विकृत प्रवृतीविरुध्द आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी फडणवीस यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेल्या काही आक्षेपार्ह पोस्ट पोलीस उपायुक्तांकडे सादर करण्यात आल्या. याप्रकरणी तातडीने पोलिसांच्या सायबर विभागाकडून चौकशी करण्यात यावी व या प्रकरणातील समाजकंटकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी दरेकर यांनी यावेळी केली.

Web Title: "Arrest the person who posted offensive posts about Fadnavis"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.