उत्तरपत्रिका घोटाळ्यातील शिपाई अटकेत
By admin | Published: June 21, 2016 03:40 AM2016-06-21T03:40:32+5:302016-06-21T03:41:13+5:30
विद्यापीठ उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरणात पसार असलेल्या एका शिपायाला पकडण्यात भांडुप पोलिसांना यश आले. अनिल सिंग असे त्याचे नाव आहे.
Next
मुंबई : विद्यापीठ उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरणात पसार असलेल्या एका शिपायाला पकडण्यात भांडुप पोलिसांना यश आले. अनिल सिंग असे त्याचे नाव आहे.
सिंग हा सहा वर्षांपासून विद्यापीठात काम करतो. अभियांत्रिकी उत्तरपत्रिका महाघोटाळा भांडुप पोलिसांनी उघडकीस आणल्यावर अटकेच्या भीतीने सिंगने पळ काढला होता. रविवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आणखी एका पसार शिपायाचा शोध सुरू आहे.
यापूर्वी भांडुप पोलिसांनी मिथुन मोरे, चिमण सोलंकी, संजय कुंभार, दिनकर म्हात्रे हे चौघे शिपाई, संदीप जाधव, रोहन मोरे हे कारकून आणि कस्टोडियन प्रभाकर वझे यांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)