स्फोटातील दोषी पुन्हा आर्थर रोडमध्ये
By admin | Published: January 2, 2016 08:37 AM2016-01-02T08:37:12+5:302016-01-02T08:37:12+5:30
७/११ मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोटात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या एहेतशाम सिद्दिकी आणि फैझल शेख यांना पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध मुंबईच्या
मुंबई : ७/११ मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोटात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या एहेतशाम सिद्दिकी आणि फैझल शेख यांना पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध मुंबईच्या न्यायालयात अन्य खटले सुरू असल्याने त्यांना नागपूरमधून हलवण्यात आले आहे.
औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी एहेतशाम सिद्दिकी आरोपी आहे. सिद्दिकीच्या वकिलांनी त्याला नागपूर जेलमधून आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात यावे, अशी मागणी केली; तर फैझल शेखवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायद्यांतर्गत खटला सुरू आहे.
फाशी झालेले गुन्हेगार
११ जुलै २००६ रोजी मुंबईतील लोकलमध्ये नऊ मिनिटांत सात बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या साखळी बॉम्बस्फोटांत १८९ लोक मृत्युमुखी पडले.
विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. यतीन शिंदे यांनी या खटल्यात पाच जणांना फाशीची तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. फाशीची शिक्षा ठोठावल्यांमध्ये सिद्दिकी आणि शेखचाही समावेश आहे.