रेती उत्खननातील फरार आरोपींना अटक
By admin | Published: November 7, 2014 10:52 PM2014-11-07T22:52:19+5:302014-11-07T22:52:19+5:30
अलिबाग तालुक्यातील कुदे भोनंग येथे अवैध रेती उत्खननाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईमधील तीन फरार आरोपींना पकडण्यात रेवदंडा पोलिसांनी यश मिळविले आहे.
बोर्ली-मांडला : अलिबाग तालुक्यातील कुदे भोनंग येथे अवैध रेती उत्खननाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईमधील तीन फरार आरोपींना पकडण्यात रेवदंडा पोलिसांनी यश मिळविले आहे.
रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीतील कुदे भोनंग येथे सुरु असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात महसूल व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत रु. १ कोटी २७ लाख किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये असलेल्या सात आरोपींपैकी चार परप्रांतीय कामगारांना बुधवारी अटक केली होती तर फरार असणारे आरोपी महेश (रमाकांत) धर्मा पाटील (३५), मंगेश शंकर घाणेकर (३२) दोघेही रा. कुदे, ता. अलिबाग तर राकेश राजाराम पाटील (२४) रा. दापोली यांना रेवदंडा पोलिसांनी गुरुवारी रात्री १० च्या सुमारास अटक करण्यात यश मिळविले आहे.
याबाबतची तक्रार रामराज मंडळाधिकारी वनिता म्हात्रे यांनी दिली होती. याबाबत अधिक तपास सपोनि आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक भडकमकर, पो.ना. सचिन खैरनार, पो. हवालदार भाग्यवान कांबळे हे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)