मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विदेशातून भारतीय बंदरात येणाऱ्या विविध मालवाहू जहाजांमधील कर्मचाऱ्यांना बंदरात पाऊल टाकण्याची परवानगी नाकारण्यात आलेली अाहे मात्र अशा परिस्थितीत देखील मालवाहू जहाजांद्वारे मालवाहतूक केली दात आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मुंबई बंदरात सुमारे 100 पेक्षा जास्त (107) मालवाहू जहाजांचे आगमन झाले.
विदेशी जहाजातील कर्मचाऱ्यांद्वारे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याने सामान उतरवताना देखीवयल विशेष काळजी घेतली जात आहे. कोणालाही जहाजातून उतरण्याची परवानगी नसल्याने क्रेन व छोट्या जहाजांच्या माध्यमातून मोठ्या जहाजातील सामान उतरवले जात आहे. 19 एप्रिल पर्यंत देशात मुंबईसहित इतर प्रमुख बंदरामध्ये 1715 जहाजांचे आगमन झाले त्यामधील 55 हजार कर्मचाऱ्यांना खाली उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली. यापैकी 1347 मोठ्या बंदरामध्ये आले त्यांना विशिष्ट ठिकाणी थांबण्याची परवानगी देण्यात आली मात्र कर्मचाऱ्यांना मात्र शोअर परमिट ( बंदरावर उतरण्याचा परवाना नाकारण्यात आला. कोरोनाचा धोका पाहता जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, ताप, सर्दी व इतर लक्षणे तपासली जात आहेत. लॉकडाऊन असल्याने 22 मार्च पासून उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बंदरात सामान उतरवणे, चढवणे किंवा अन्य कोणत्याही बाबतीत कोणतेही दंड, वाढीव शुल्क आकारु नये असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे 19 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत 6 लाख 31 हजार मेट्रिक टन कार्गोची हाताळणी करण्यात आली. त्यामध्ये साखर, तेल व इतर वस्तुंचा समावेश होता.