जिल्ह्यात 13 हजार 271 गौरींचे आगमन
By Admin | Published: September 2, 2014 11:12 PM2014-09-02T23:12:15+5:302014-09-02T23:12:15+5:30
ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवारी विधिवत पध्दतीने गौरींचे आगमन झाले आहे.
ठाणो : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवारी विधिवत पध्दतीने गौरींचे आगमन झाले आहे. ठाणो पोलीस आयुक्तालयात 11,क्क्8 तर ग्रामीण भागात सार्वजनिक 96 आणि खाजगी 2,167 गौरींचे आगमन झाले.
गणपती बाप्पानंतर दोन दिवसांनी पाठोपाठ गौराई मातेचे मंगळवारी मोठय़ा थाटामाटात टिटवाळा शहरासह ग्रामीण भागात आगमन झाले. टिटवाळा शहरात मातीच्या व पितळेच्या गौराई पहावयास मिळतात. परंतु, ग्रामीण भागातील गौराई माता वेगळ्याच थाटाची.
ती गौराई पारंपरिक पद्धतीची फुलांची गौराई. त्यात विविध पाच प्रकारच्या वनस्पती लव्हाळे,
धाप्याचे फुल, कुर्डू, कांदाचा वेल, शेंदोळे फुल अशी ही गावरान
वनात मिळणारी गौराई. तिचा थाट काही वेगळाच. घरातील सुहासिनी घरात लाल मातीने पट्टे पाडून त्यावरून या गौराई मातेला चालविली जाते. त्यावर तिची पावले हळदी, कुंकू व भाकरीच्या पिठाने काढली जातात.
ही परंपरा पहाण्यासारखी व जोपाण्यासारखी आहे. यावेळी
गौरी मातेला गोडधोड खिरपुरी
व पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात
येतो. ही सासरवाशीण
आपल्या माहेरी दोन दिवसांची पाहुणी म्हणून येत
असल्याचे जाणकार महिला वर्गातून बोलले जाते. यंदा गौरींचे आगमन लांबल्याने सात दिवसांच्या बाप्पाबरोबर गौराईलाही भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातो. (वार्ताहर)
गणरायाचे जिल्ह्यात स्वागत झाल्यानंतर आता गौरीचेही आगमन मंगळवारी सांयकाळी झाले. ठाण्यात परिमंडळ 1ठाणोमध्ये 1,51क्, परिमंडळ 2 भिवंडीमध्ये 375, परिमंडळ 3 कल्याणमध्ये 2,75क्, परिमंडळ 4 उल्हासनगरमध्ये 5,165 आणि परिमंडळ 5 वागळेमध्ये 1,388 गौरींचे आगमन झाले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काशिमिरामध्ये सार्वजनिक 76 आणि गणोशपुरी येथे 2क् तर खाजगी 2167 गौरींचे आगमन झाले आहे. यामध्ये मिरारोड 32, भाईंदर 9क्, उत्तन क्6, गणोशपुरी 151, भिवंडी तालुका 75, पडघा 75, शहापुर 162, कसारा क्3, मुरबाड 42क्, किन्हवली 47क्, कल्याण 198, कुळगांव 38क्, टोकावडे 2क् गौरींचे आगमन झाले आहे.
आता या गौरींची बुधवारी पूजा होणार असून गुरुवारी सात दिवसांच्या गणरायाबरोबरच त्यांनाही निरोप देण्यात येणार आहे.
4तालुक्यात आज सर्वत्र मोठय़ा उत्साहाने गौरींचे आगमन झाले. थेट स्वयंपाक घरात चुलीजवळ या गौराईसाठी आरास मांडली जाते. पाटावर शोभिवंत चादर अंथरून त्यावर तांदळाची रास ठेवून लक्ष्मीच्या रुपाने आलेल्या गौरीचे स्वागत ग्रामीण भागात झाले.
4वाडा, कुडूस या शहरी भागात माती, शाडू किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यात आल्या तर काही ठिकाणी गौरीचे मुखवटे तयार करून त्याचे पूजन करण्यात आले. शेतक:यांनी मात्र पारंपरिक पद्धतीनेच उत्सव साजरा करण्याला पसंती दिली.
4गौरी म्हणजे माहेरला आलेली माहेरवाशीण अशी o्रद्धा ग्रामीण भागात दिसून येते. जंगलातील विविध वेली गौरीच्याच नावाने परिचित असणारे इंदईचे आकर्षक फूल, सिंदीचे फूल, गायगवरीची वेल, कंटोलीची वेल, कांदेल आदी जंगलातील वेली दिंडीच्या पानात लपेटून हिरवी गौराई तयार केली जाते.
गौराई
आली माहेरा
या हिरव्या गौराईला मंगळसूत्र, हिरव्या बांगडय़ा, नथ आदी स्त्रियांची सर्व आभूषणो घातली जातात. घरात तांबडय़ा मातीचे पट्टे ओढून त्यावर तांदळाच्या पिठाने गौरीची पावले उमटवली जातात. माहेराला आलेली गौरी संपूर्ण घरात आनंदाने भरल्या मनाने व प्रेमाने फिरते हा यामागील भाव आहे. गौरीसाठी आळू, भेंडी, माठाची भाजी यांचा नैवैद्य दाखवला जातो. खेडय़ापाडय़ात आळूचे पान, तांदळाचे पीठ, दही यापासून पातवड नावाचा पदार्थ खास करून बनवला जातो. वैशिष्टय़ म्हणजे अतिशय रुचकर असणारा हा पदार्थ वर्षातून एकदाच लाडक्या गौराईसाठीच बनवला जातो. माहेरवाशीण आल्याची भावना असल्याने ग्रामीण भागात या उत्सवाप्रती एक पारंपरिक भावना आहे.