मुंबई : मुंबई शहरापासून उपनगरापर्यंत गणपतीचाच जयजयकार सुरू आहे. आता पुढील १२ दिवस मुंबईकरांवर गणरायाचेच अधिराज्य दिसणार असून सर्वत्र भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.गिरगाव आणि गिरणगावातील गल्लोगल्ली आणि वाड्यांमध्ये गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला जोरदार तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळपासून सुरुवात झालेले आगमन सोहळे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या वेळी ढोलताशे, ध्वज पथकांची सलामी देऊन लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यात गिरगावकर आणि गिरणगावकर व्यस्त दिसले.गिरगावातील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला मुंबईतील पहिला गणेशोत्सव केशवजी नाईक चाळीचेही यंदा शतकोत्तर वर्ष असल्याने येथे गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गिरगावचा महाराजा, खेतवाडीच्या गल्ल्यांमधील विविधरूपी बाप्पा, परमानंदवाडी, चंदनवाडी या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईकर आवर्जून हजेरी लावताना दिसतात. यंदाही सामाजिक विषयांवर संदेश देणारे देखावे करण्यात आले आहेत.गिरणगावचा राजासह घोडपदेवचा राजा, राणीबागचा विघ्नहर्ता, रंगारी बदक चाळीतील लाडका लंबोदर, काळाचौकीचा महागणपती अशा विविध मंडळांनी भक्तांना आकर्षित करण्यासाठी विविध देखावे, सजावट आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे पुढील १२ दिवस गणेशभक्तांना या ठिकाणी वेगवेगळी मेजवानी असेल.पुढच्या वर्षीबाप्पा १९ दिवस उशिराने येणारयंदा गणेश चतुर्थी शुक्रवार २५ आॅगस्ट रोजी आली आहे. परंतु पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशिराने गुरुवार १३ सप्टेंबर २०१८ रोजी होणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. गणेशभक्तांच्या माहितीकरिता त्यांनी पुढील २१ वर्षांतील गणेश चतुर्थीचे दिवस आणि कोणत्या वर्षी कोणता अधिक महिना येणार आहे, त्याची माहितीही दिली.दुकानांसह बाजारांत गर्दीबाप्पाची हौस पुरवण्यासाठी मिठाईच्या दुकानांपासून फुल मार्केटमध्ये भक्तांनी गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठांवरही बाप्पाचेच राज्य दिसले. झेंडूच्या फुलांपासून मोदकांच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. जीएसटीमध्ये ठप्प पडलेले बाजारही बाप्पाच्या आगमनाने फुलल्याचे व्यापारी संघटनांनी सांगितले.ध्वनिप्रदूषणासाठीतक्रार निवारण कक्षध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रणाकरिता सर्व पोलीस ठाणेनिहाय नेमणूक करण्यात आलेल्या पदनिर्देशित अधिकाºयांची यादी तसेच माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सण / उत्सवादरम्यान रस्ते, पदपथांवरील मंडपांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात विशेष अधिकाºयांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ध्वनिप्रदूषण व अनधिकृत मंडपांबाबतच्या तक्रारी टोल फ्री क्रमांक १२९२ व १२९३ वर नोंदविता येतील.खड्ड्यांचे विघ्न हरणार का?गणरायाच्या आगमनाने मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी पाहायला मिळाली. या वेळी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला गणेश मंडळांतील कार्यकर्ते दिसले. मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कार्यकर्त्यांना आमगन सोहळ्यात बराच त्रास सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया बºयाच मंडळांनी व्यक्त केली.- पश्चिम उपनगरातही डीजे वाजवण्यावरबंदी असल्याने ढोलताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले. मालाडमधील त्रिवेणी नगर येथील वायशेत पाडा क्रमांक २ सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळासह जोगेश्वरी पूर्वेकडील कोकणी पाडाचा शिवशक्ती मित्रमंडळाचा गणपती, श्यामनगरचा राजा, मेघवाडी राजा, मेघवाडीचा अधिपती, जोगेश्वरीचा इच्छापूर्ती, टिळकवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी गणपतींचे आगमन गुरुवारी मोठ्या उत्साहात झाले.प्रेमनगर विकास मंडळ, जोगेश्वरीचा राजा या गणेशोत्सव मंडळांचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून बारा दिवस धूम असणार आहे. अंधेरीचा राजा आणि डी.एन. नगरचा सार्वजनिक गणेशोत्सव या मोठ्या गणपतींचे आगमन पश्चिम उपनगरात झाले आहे.कोणत्या वर्षी कधी येणार बाप्पा?- गुरुवार, १३ सप्टेंबर २०१८ (ज्येष्ठ अधिकमास)- सोमवार, २ सप्टेंबर २०१९- शनिवार, २२ आॅगस्ट २०२० (आश्विन अधिकमास)- शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१- बुधवार, ३१ आॅगस्ट २०२२- मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ (श्रावण अधिकमास)- शनिवार, ७ सप्टेंबर २०२४- बुधवार, २७ आॅगस्ट २०२५- सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ (ज्येष्ठ अधिकमास)- शनिवार, ४ सप्टेंबर २०२७- बुधवार, २३ आॅगस्ट २०२८,- मंगळवार, ११ सप्टेंबर २०२९ (चैत्र अधिकमास)- रविवार, १ सप्टेंबर २०३०- शनिवार, २० सप्टेंबर २०३१ (भाद्रपद अधिकमास)- बुधवार, ८ सप्टेंबर २०३२- रविवार, २८ आॅगस्ट २०३३,- शनिवार, १६ सप्टेंबर२०३४ (आषाढ अधिकमास)- बुधवार, ५ सप्टेंबर २०३५- रविवार, २४ आॅगस्ट२०३६- शनिवार, १२ सप्टेंबर२०३७ (ज्येष्ठ अधिकमास)- गुरुवार, २ सप्टेंबर २०३८
जल्लोष गणरायाच्या आगमनाचा; बाजारपेठाही फुलल्या, ढोलताशे आणि ध्वजपथकांच्या सलामीने स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 5:43 AM