Join us

सोन्याच्या पावलांनी गैराईचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:06 AM

मुंबई : गणपती बाप्पाचे आगमन होऊन दीड दिवसाच्या श्रीगणेशाचे विसर्जन झाल्यानंतर, रविवारी मुंबईत अनेक ठिकाणी घरोघरी गौरींचे आगमन झाले. ...

मुंबई : गणपती बाप्पाचे आगमन होऊन दीड दिवसाच्या श्रीगणेशाचे विसर्जन झाल्यानंतर, रविवारी मुंबईत अनेक ठिकाणी घरोघरी गौरींचे आगमन झाले. लक्ष्मीच्या पावलांनी येणाऱ्या गौरीच्या स्वागतासाठी घरोघरी फराळ, मिठाई यांची तयारी सुरू झाली होती. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रात घरांमध्ये गौरींचे आगमन होते. गौराईला सजविण्यासाठी नऊवारी, पैठणी तसेच विविध दागिने यांची घरोघरी तयारी सुरू झाली. गणपती बाप्पा नंतर तीन दिवसांनी गौराईचे आगमन झाल्याने घरोघरी आनंद द्विगुणित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गौरी पूजनाच्या दिवशी अनेक घरांमध्ये विविध पूजाविधी करण्यात येतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी शेजारी भाविकांना बोलावून जेवणाचा कार्यक्रमही करण्यात येतो. गौरी पूजनाच्या दिवसाची तयारी करण्यासाठी रविवारी संध्याकाळच्या वेळेस अनेक बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी जमली होती.