गणरायाच्या आगमनापूर्वी पालिका करणार खड्डेमुक्त मुंबई ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 03:15 AM2018-08-31T03:15:16+5:302018-08-31T03:16:16+5:30

खड्डे बुजविण्याचे आश्वासन : २७ हजार ३६६ खड्ड्यांची नोंद

Before the arrival of Ganaraya, will the municipality be free? | गणरायाच्या आगमनापूर्वी पालिका करणार खड्डेमुक्त मुंबई ?

गणरायाच्या आगमनापूर्वी पालिका करणार खड्डेमुक्त मुंबई ?

Next

मुंबई : गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त असावेत, यासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेला साकडे घातले आहे. पावसानेही विश्रांती घेतल्यामुळे १३ सप्टेंबरपूर्वी सर्व खड्डे बुजविण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे. त्यानुसार ९० टक्के खड्डे बुजविल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र तब्बल २७ हजार ३६६ खड्ड्यांची जागृत मुंबईकरांनी नोंद करून महापालिकेला आव्हान दिले आहे.

गेल्या वर्षी मुंबईतील खराब रस्त्यांवर रेडिओ जॉकी मलिष्का हिने विडंबन गीत बनवून पालिकेच्या कारभारावर टीका केली होती. त्यानंतर मुंबईतील खड्डे मोजण्याची मोहीम काही मुंबईकरांनी राबविली. त्यानुसार मुंबईतील रस्त्यांवर २० हजार खड्डे मोजण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून महिनाभरापूर्वी सोशल मीडियावरून ही मोहीम सुरू केली असून यासाठी े४ेुं्रस्रङ्म३ँङ्म’ी२.ूङ्मे या संकेतस्थळाच्या माध्यमातून २७ हजारांहून अधिक खड्ड्यांची नोंद झाली. सर्वाधिक खड्ड्यांचे शहर अशी मुंबईची नोंद होण्यासाठी जगभरातील विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये अर्जही करण्यात आला आहे. मात्र खड्ड्यांसारखा विषय हा राजकीय असून खड्ड्यांची मोजणी करणे शक्य नसल्याचे सांगत गिनीज बुकने हा अर्ज फेटाळला तर इतर दोन्ही रेकॉर्ड बुक्सने हा अर्ज स्वीकारला असून दिलेली माहिती तपासून पाहून त्याबद्दलचा निर्णय घेण्यात येणार आहे.

विश्वासार्हतेबद्दल साशंकता
महापालिकेकडे २,२९४ खड्ड्यांची नोंद झाली होती, यापैकी २८८ खड्डे शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच खड्ड्यांच्या या नोंदणीच्या विश्वासार्हतेबाबत पालिका अधिकारी साशंकता व्यक्त करीत आहेत. मात्र १५ टक्के खड्डे दोनदा मोजले गेल्याचे लक्षात आल्यानंतर दोनदा मोजणी झालेले खड्डे डेटाबेसमधून काढून जिओ टॅगिंगच्या मदतीने रस्त्यांना टॅग केले आहे. यामुळे एकच खड्डा दोनदा मोजला गेला नसल्याचा दावा या मोहिमेतील कार्यकर्त्यांनी केला आहे.

Web Title: Before the arrival of Ganaraya, will the municipality be free?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.