Join us

भारताला मिस वर्ल्डचा किताब पटकावून देणा-या मानुषीचं विमानतळावर जल्लोषात आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 8:12 AM

मुंबई - भारताला मिस वर्ल्डचा किताब पटकावून देणारी सौंदर्यवती मानुषी छिल्लरचं मध्यरात्री भारतात जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे.

मुंबई - भारताला मिस वर्ल्डचा किताब पटकावून देणारी सौंदर्यवती मानुषी छिल्लरचं मध्यरात्री भारतात जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर भारतीयांनी मानुषीचं जंगी स्वागत केलं आहे. भारताला मिस वर्ल्डचा किताब मिळवून दिल्यानंतर मानुषी सिंगापूरला गेली होती. चीनमधल्या पार पडलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत जवळपास 17 वर्षांनंतर मानुषीनं मिस वर्ल्डचा किताब पटकावून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सिंगापूरमधला कार्यक्रम संपल्यानंतर ती मध्यरात्रीच्या सुमारास भारतात दाखल झाली. मानुषी भारतात येणार हे तिच्या चाहत्यांसह देशवासीयांना समजल्यानंतर त्यांनी रात्री 12 वाजल्यापासूनच छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गर्दी केली होती. हातात भारताचा ध्वज घेऊन आलेल्या देशवासीयांनी मानुषीचं विमानतळावर जल्लोषात स्वागत केलं. मानुषीला कॅमे-यात टिपण्यासाठी विमानतळावर अनेकांची अक्षरशः झुंबड उडाली. मानुषीनेसुद्धा हात वर करत स्मितहास्यानं सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आहे. याप्रसंगी मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं विमानतळावर उपस्थित होते. 

 

टॅग्स :विश्वसुंदरी