राज्यात तीन दिवसांत मान्सूनचे होणार आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 03:21 AM2019-06-15T03:21:43+5:302019-06-15T03:21:59+5:30
वायू चक्रीवादळाचा जोर कमी झाल्याने कर्नाटकच्या सीमेवर रेंगाळलेला मान्सून सक्रिय झाला आहे.
Next
मुंबई : वायू चक्रीवादळाचा जोर कमी झाल्याने कर्नाटकच्या सीमेवर रेंगाळलेला मान्सून सक्रिय झाला आहे. येत्या ३ दिवसांत कोकणमार्गे तो राज्यात दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. शनिवारी कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल. गोव्यासह महाराष्ट्रात १७ व १८ जून रोजी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.