पंकज रोडेकर, ठाणेनवरात्रोत्सव नवरात्रोत्सव म्हटले की, सांस्कृतिक आणि पारंपरिक उत्सव अशीच ठाणे जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे. हीच सत्यता सर्वत्र पोहोचविण्यासाठी आणि जास्तीतजास्त तरुणांना या उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी ठाण्यातील सार्वजनिक मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे. जिल्ह्यात येत्या गुरुवारी दोन हजारांहून अधिक ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापनेबरोबर फोटो आणि कलश / घटांची स्थापना (सार्वजनिक आणि खाजगी) होणार आहे. तर ग्रामीण आणि शहर भागांतही रावणदहन आणि रामलीला असे कार्यक्रम आयोजित के ले आहेत. त्यामुळे नऊ दिवस तरुणाईची सर्वत्र धूम दिसणार आहे. आगामी निवडणूक आणि वाढत्या उत्सवाकडे लक्ष केंद्रित करून पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. मुख्यत: उत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच राहणार आहे.ठाणे जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात ६९६ (सार्वजनिक आणि खाजगी) मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर ३६८ ठिकाणी फोटो मांडण्यात येणार असून २७० ठिकाणी कलश/घटांची स्थापना होईल. तर तब्बल ४ ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम होणार आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १ हजार ३२८ ठिकाणी (सार्वजनिक व खाजगी) मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ३३१ ठिकाणी फोटो मांडण्यात येणार असून १ हजार २८७ ठिकाणी कलश/घटांची स्थापना केली जाणार आहे. चार ठिकाणी रावणदहनाचे तर दोन ठिकाणी रामलीला कार्यक्रम होणार आहेत.
दोन हजार दुर्गामातांचे आगमन
By admin | Published: September 24, 2014 12:14 AM