मुंबई : कोरोनाचे नियम मोडणाऱ्या, मास्क घालणार नाहीत; अशा व्यक्तिंवर मुंबई महापालिका दंडात्मक कारवाई करत असून, १९ मार्चपर्यंत मुंबई महापालिकेने मुंबई स्तरावर १९ लाख ९२ हजार ५०० प्रकरणांत कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत ४० कोटी २१ लाख ३० हजार २०० रुपये एवढा दंड वसूल केला आहे तर २० मार्च रोजी १४ हजार १४२ प्रकरणांत कारवाई करण्यात आली असून, २८ लाख २८ हजार ४०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. तर एकूण २० लाख ६ हजार ६४२ प्रकरणांत कारवाई करण्यात आली असून, ४० कोटी ४९ लाख ५८ हजार ६०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरु असतानाच मुंबईकर अद्यापही मास्क घालण्याबाबत हलगर्जीपणा दाखवत आहेत. विशेषत: आता तर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परिणामी मुंबईकरांनी गांर्भीयाने आता मास्क घालण्याबाबत, नियम पाळण्याबाबत सतर्क राहिले पाहिजे, असे महापालिकेचे म्हणणे आहे.
उद्धटपणा सुरुच; मुंबईकर मास्क लावणार कधी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:06 AM