मूड इंडिगोच्या ‘आवेग’चा कलाविष्कार

By Admin | Published: July 1, 2015 12:38 AM2015-07-01T00:38:33+5:302015-07-01T00:38:33+5:30

आयआयटीच्या मूड इंडिगो, २०१४ च्या विजेत्यांनी नुकताच नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे दमदार कलाविष्कार सादर केला.

The art inventions of Mood Indigo's 'impulse' | मूड इंडिगोच्या ‘आवेग’चा कलाविष्कार

मूड इंडिगोच्या ‘आवेग’चा कलाविष्कार

googlenewsNext

मुंबई : आयआयटीच्या मूड इंडिगो, २०१४ च्या विजेत्यांनी नुकताच नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे दमदार कलाविष्कार सादर केला. ‘लिव्ह युअर पॅशन’ या संकल्पनेवर आधारित या ‘आवेग’ कलाविष्कारात एकल आणि समूहाविष्कार सादर झाले.
‘मूड इंडिगो’ फेस्टिव्हलच्या विविध स्पर्धेतील विजेत्यांनी या ठिकाणी परफॉर्मन्स सादर केले. त्यात ‘द चोझन वन’ या स्पर्धेचा विजेता करण भानुशाली यांनी एकपात्री अभिनयाचा भन्नाट आविष्कार सादर केला. तर प्रियंजली राव हिने आपल्या क्लासिकल नृत्याविष्काराने उपस्थितांचे मन जिंकले. शिवाय, ‘ताल-मेल’ या सादरीकरणांतर्गत जुगलबंदीवरही ठेका धरला.
बद्री चव्हाण या विद्यार्थ्याने एकपात्री अभिनयातून भावविष्कारांचे पैलू उलगडले. या वेळी ‘ह्युमर मी’ या स्पर्धेचा विजेता ठरलेला जगप्रीत जग्गी याने स्टँडअप कॉमेडीने प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळविला. तर या कार्यक्रमात लुघपट स्पर्धेतील ‘डायरेक्टर्स कट’ या फिल्मचे स्क्रीनिंग झाले.
या वेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निखिल डिसूझाने हजेरी लावली. या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना कॉलेजच्या पलीकडील स्पर्धांमध्ये अशाच आत्मविश्वासाने सहभागी होण्याचा सल्ला दिला. तर कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी डहाणूकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘थर्ड बेल’ हा नाट्याविष्कार सादर केला. (प्रतिनिधी)

Web Title: The art inventions of Mood Indigo's 'impulse'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.